Wednesday, September 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

आता दोन वर्षात ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ करता येणार अपडेट; बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?

Surajya Digital by Surajya Digital
February 1, 2022
in Hot News, अर्थाअर्थ, देश - विदेश
0
आता दोन वर्षात ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ करता येणार अपडेट; बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : कर रचनेत कुठलाही बदल न झाल्यानं एकीकडे करदात्यांची निराशा झाली. तर दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स रिटर्न संदर्भात मोठी घोषणा केली. आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी दोन वर्षांची मुभा देण्यात आली आहे. जर करदात्यानं वार्षिक उत्पन्नाची घोषणा करताना रिटर्नमध्ये काही चूक केली असेल तर त्याला दोन वर्षात ही चूक सुधारता येणार आहे. यासाठी त्याला आपलं रिटर्न अपडेट return updates करावं लागणार आहे.

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला. इन्कम टॅक्स आणि इतर सामान्यांशी संबंधित असलेल्या कररचनेत काहीही बदल करण्यात आले नाही. त्यामुळे, यंदाच्या बजेवर विरोधकांकडून टीका होत आहे. परंतु क्रिप्टोकरन्सी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल रूपी नावाची डिजिटल करन्सी लवकरच चलनात येणार असल्याची घोषणा सितारमण यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना पीपल्स फ्रेंडली आणि प्रोग्रेसीव्ह बजेट असल्याचं म्हटलं आहे. विकासाचा नवा विश्वास घेऊन आलेला हा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना अनेक संधी उपलब्ध करुन देणार हा अर्थसंकल्प आहे.

यंदांचे बजेट more Infrastructure, More Investment, More Growth, आणि More Jobs च्या संभाव्यतेनं भरलेला बजेट आहे. त्यामुळे, ग्रीन जॉब्सच्याही संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करत देशवासीयांना संबोधित केले.

भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

□ अर्थसंकल्प – 25000 किमी रस्ते बांधणार #Update
#सुराज्यडिजिटल
• पायाभूत सुविधांसाठी 20000 कोटींची तरतूद
#Budget2022
– पर्वतमाला योजनेतून रस्त्यांचं जाळं तयार करणार
#surajyadigital
– 2023 हे वर्ष मिलेट्स वर्ष जाहीर, मिलेट्सच्या प्रसारासाठी कार्य करणार
#budget
– तेलबिया उत्पादनाला प्राधान्य दिले जाणार
#बजेट #अपडेट
– पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत 100 कार्गो टर्मिनल तयार केल जातील

□ अर्थसंकल्प #BudgetSession
– 400 नव्या वंदे भारत ट्रेन सुरु करणार, रेल्वे रस्ते-जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक होणार
#सुराज्यडिजिटल
– अर्थसंकल्पामध्ये 2047 पर्यंतची ब्ल्यू प्रिंट
#Budget2022
– 4 लॉजिस्टिक पार्क तयार केले जातील #Update
#बजेट #budget
– वन स्टेशन, वन प्रॉडक्ट ही संकल्पना राबवणार
#अपडेट #surajyadigital
– ज्या वस्तूसाठी जे शहर प्रसिद्ध आहे, तिथे त्यासंदर्भातील उद्योगाला चालना दिली जाईल.

□ बजेट – 5 नदीजोड प्रकल्पांसाठी मंजुरी
#surajyadigital
– मेट्रो ट्रेनचं जाळं उभं करण्यासाठी प्रोत्साहन
#metro #train
– नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील #बजेट #Update
#BudgetSession
– कृषी आधारित स्टार्टअप्सना मदत करण्यासाठी योजना, नाबार्डची मदत घेणार
#अपडेट #Budget2022
– पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा उपयोग वाढेल
#budget #सुराज्यडिजिटल
– जलसिंचन योजनेतून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणणार

□ कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश #BudgetSession #बजेट #अपडेट #budget #Update #agricultural
#surajyadigital #सुराज्यडिजिटल #Budget2022
नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासह आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरु आहे. जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

□ देशात मेट्रो ट्रेनचं जाळं उभं करण्यासाठी प्रोत्साहन देणार – अर्थमंत्री #Budget2022 #BudgetSession
#surajyadigital #सुराज्यडिजिटल #metrotrains #metro
● देशात 25 हजार किमीचं रस्त्याचं जाळं उभं करणार. तसंच मेट्रो ट्रेनचं जाळं उभं करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. तसंच पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार असून रेल्वेचं जाळं विकसित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. #budget

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अधिक व्हिडिओ, प्रतिक्रियेसह ग्राफिक्स पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

□ बजेट – #BudgetSession

* शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही चॅनेल सुरु होणार
#सुराज्यडिजिटल
* प्रादेशिक भाषेत शिक्षण देणार
#Budget2022
* शिक्षणासाठी डिजिटल विद्यापीठ
#budget #अपडेट
* मानसिक आरोग्यासाठी योजना
#surajyadigital
* आपात्कालीन विमा अंतर्गत 5 लाखाची मदत
#बजेट
* हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद
#hospitality
* मध्यम व लघू उद्योजकांसाठी 2 लाख कोटींची आर्थिक मदत

□ अर्थसंकल्प – 2000 पोस्ट ऑफिसेस बँकिंग व्यवस्थेचा भाग होणार #अपडेट
#बजेट #budget
•व्हायब्रंट व्हिलेज योजनेसाठी आर्थिक मदत –
#सुराज्यडिजिटल
पोस्ट ऑफिसेसमध्ये बँकांमध्ये मिळणाऱ्या सुविधा मिळणार
#surajyadigital
– 75 डिजिटल बँकिंग युनिट्स
#digitalbanking #ropeway
– 3.8 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचवण्यासाठी 60 हजार कोटी
#BudgetSession
• पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटी
#Budget2022
• 60 किलोमीटर लांबीचे 8 रोपवे उभारण्यात येणार

□ बजेट – महिला सक्षमीकरणासाठी योजना
#बजेट #budget #BudgetSession
– ईशान्य राज्यांसाठी नवीन योजना, 15000 कोटी रुपयांची तरतूद
#सुराज्यडिजिटल
– अत्यंत मागास भागातील लोकांसाठी खास योजना
#Budget2022
– उद्योगधंदे सुरळीत करण्यासाठी जुनी प्रक्रिया रद्द, वन विंडो सुविधेअंतर्गत पोर्टल सुरू
#onewindo
– ई-पासपोर्टची घोषणा
#ePassport #ePass
– अर्बन सेक्टर पॉलिसी तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती,
#surajyadigital
– समितीच्या शिफारशींनुसार टाऊन प्लॅनिंग, नोकऱ्या आणि व्यवसाय उपलब्ध करून देणार

□ पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद
#surajyadigital #बजेट #Budget2022 #सुराज्यडिजिटल #budget #pmhousing #BudgetSession
शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. मध्यमवर्गीय आणि गरिबांना परवडणारी घरं मिळावीत यासाठी खासगी बिल्डरांशी चर्चा करणार असून मध्यस्थांमुळे वाढणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 80 लाख घरं बांधणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

□ बजेट ई-वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन –
#Budget2022
– चार्जिंग स्टेशनऐवजी बॅटरी अदलाबदल व्यवस्था आणणार #सुराज्यडिजिटल
#BudgetSession
– मोठ्या 5 टाऊनशिपमध्ये शैक्षणिक संस्था
#educational
– 700 नव्या ईलॅब
#Elab #budget
-2 लाख आधुनिक अंगणवाड्या तयार करणार
#surajyadigital
– 21 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरु होणार
#बजेट
• जागांचं रजिस्ट्रेशन कुठूनही करता येईल, प्रयत्न सुरु
#oneproduct
– एक उत्पादन, एक रेल्वे स्टेशन योजना लागू होणार

□ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल
#Budget2022 #educational #सुराज्यडिजिटल #BudgetSession #बजेट #surajyadigital #budget #PM #eVidya
PM eVIDYA मधील वन क्लास वन टीव्ही चॅनेल योजना वाढवण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरु करणार असून त्याची संख्या 12 वरुन 200 पर्यंत वाढवण्यात येईल. प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील. यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजीटल साधनांचा वापर करण्यात येईल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

□ बजेट – टॅक्ससंदर्भात मोठी घोषणा #surajyadigital
#BudgetSession
• सहकार क्षेत्राला 18 टक्क्यांनुसार कर भरावा लागतो. हा टॅक्स 15 टक्के करण्यात आला.
#Budget2022 #सुराज्यडिजिटल
– को-ऑपरेटिव्ह सोसायटी ज्यांचे उत्पन्न 1 ते 10 कोटी आहे, त्यांचा कर 12 टक्क्यांपासून 7 टक्क्यांनी कमी करण्यात आला
#cooperative #incometax
– आयकर रिटर्न भरल्यानंतरही बदल करता येणार, करदात्यांनी जी आकडेवारी सादर केली आहे, त्यात बदल करण्याची संधी मिळेल.
#income #tax #taxseason
– इन्कम टॅक्स रिटर्नमधील सूसूत्रीकरणासाठी 2 वर्षांची मुदत

□ बजेट – मागास 112 जिल्ह्यांचा विकास
#surajyadigital
• संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी 25 कोटी
#सुराज्यडिजिटल
– लष्करासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी निर्यातीवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर राहण्यावर भर
#BudgetSession
– 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग
#DigitalBank
पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होईल
#postoffice #ATM
•कार्बन उत्सर्जन कमीत कमी करण्यावर भर

– सौरऊर्जेला प्राधान्य देणार
#Budget2022
– कोळशापासून रसायनं निर्मितीसाठी 4 पायलट प्रकल्प
#telecom
– टेलिकॉम क्षेत्रात रोजगार निर्मिती

□ मोठी घोषणा – आरबीआयचं डिजिटल चलन येणार
#surajyadigital #सुराज्यडिजिटल
– डिजिटल चलन यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. देशात रिझर्व्ह बँकेकडून (RBI) डिजिटल चलन जारी केले जाणार आहे.
#RBI #BudgetSession #Budget2022
केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजिटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी जारी करणार आहे. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

□ बजेट – आयकरात कोणताही बदल नाही आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही.
#budget2022 #सुराज्यडिजिटल
• सलग सहाव्या वर्षी कररचनेत कोणताही बदल नाही
#GST #surajyadigital
– जीएसटी स्थापना झाल्यापासून एका वर्षात 1,40,000 कोटी रुपयांची विक्रमी वसुली
#BudgetSession #tax
– क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून मिळवलेल्या उत्पन्नावर 30 टक्के कर
#criptocurrency
– करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व संपत्ती जप्त करणार

□ घरोघरी 5G सेवेचा संकल्प- अर्थमंत्री
#surajyadigital #5G #सुराज्यडिजिटल #5GNetwork #Budget2022 #BudgetSession
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5G मोबाईल सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली. 2023 पर्यंत देशातील प्रत्येक घरात 5G सेवा पुरवण्याचा मोदी सरकारचा संकल्प असल्याचे निर्मला सीतारामण यांनी सांगितले. 5G सेवा भक्कम करण्यासाठी इकोसिस्टमची उभारणी करण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात फायबर केबल्सच्या माध्यमातून 5G सेवेचं जाळे विणण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

□ जानेवारीमध्ये 1 लाख 40 हजार 986 कोटीचं जीएसटी संकलन #Budget2022 #जीएसटी #GST #surajyadigital #सुराज्यडिजिटल #BudgetSession
जीएसटीच्या रचनेत अनेक बदल झाले असून एक कराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. कोरोना काळ असूनही महसूल वाढताना दिसत आहे. जानेवारीमध्ये 1 लाख 40 हजार 986 कोटीचं जीएसटी संकलन झालं आहे. जे आतापर्यंतचं सर्वाधिक आहे. कोरोनाचा काळ असतानाही अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्यानेच हे शक्य झालं आहे, असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

□ अशी असेल आर्थिक वर्ष 2022-23 ची करप्रणाली
#surajyadigital
– 5 लाखांपर्यंत कोणताही कर नाही
#BudgetSession
– 5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर
#budget2022
– 7.5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के कर लागणार
#budget
– 10 ते 12.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर लागणार
#सुराज्यडिजिटल
– 12.5 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के कर लागणार
#बजेट
– 15 लाखांपुढच्या उत्पन्नावर पुढे 30 टक्के कर लागणार.

□ मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?

स्वस्त होणार- चामडे, बूट, चपला, विदेशी सामान, कपडे, शेतीशी संबंधित वस्तू, पॅकेजिंग डब्बे, पॉलिश केलेले डायमंड, मोबाईल फोन, मोबाईल चार्जर, जेम्स अँड ज्वेलरी

– हे महागणार- कॅपिटल्स गुड्सवर आयात शुल्कावरील सूट रद्द करण्यात आली आहे. आता कॅपिटल्स गुड्सवर 7.5 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे.

□ मोठी घोषणा – आरबीआयचं डिजिटल चलन येणार

– डिजिटल चलन यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. देशात रिझर्व्ह बँकेकडून (RBI) डिजिटल चलन जारी केले जाणार आहे.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजिटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी जारी करणार आहे. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

Tags: #UnionBudget2022 #budget #crypto #currency #budget#अर्थसंकल्प #केंद्रीय #बजेट #रिटर्न #क्रिप्टो #करन्सी
Previous Post

दुकानात, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार; महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे

Next Post

कोयना धरण परिसरात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
कोयना धरण परिसरात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप

कोयना धरण परिसरात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

February 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28  
« Jan   Mar »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697