सातारा : जिल्ह्यात आज काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी १० वाजताच्या जवळपास ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप कोयना धरण koyana dam परिसरात झाला. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती information धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
गेल्या महिन्यात बसलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर Mild aftershocks ३३ दिवसांच्या विश्रांतीनंतर हा धक्का बसला. हा भूकंप कोयनेसह सातारा, सांगली, रत्नागिरी Satara, Sangli, Ratnagiri जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी जाणवल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या महिन्यात ८ जानेवारीला कोयना परिसरात झालेल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना विभागात हेळवाक या गावाजवळ होता. एका महिन्यानंतर याच परिसरात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू एक किमी पुढे सरकून तो काडोली या गावाजवळ गेला आहे. केंद्रबिंदू सरकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर हा धक्का जाणवल्याने काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा भूकंप कोयनेसह सातारा, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी जाणवल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे . 3.3 magnitude earthquake in Koyna dam area
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आज मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसला. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागातील काडोली गावाच्या पश्चिमेला ७ किमी अंतरावर आहे.
८ जानेवारीनंतर १ फेब्रुवारीला सकाळी ९.४७ ला भूकंपाचा सौम्य धक्काने कोयना परिसर हादरला आहे. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाच्या धक्क्याची खोली ४५ इतकी होती.
या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून जवळच काडोली गावाच्या पश्चिमेस ७ किमी होते. हा धक्का कोयना परिसरात जाणवलाय. या धक्क्यामुळे पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे तहसीलदार रमेश पाटील (Tehsildar Ramesh Patil) यांनी स्पष्ट केले.