वेळापूर : कोळेगाव (ता. माळशिरस) येथील तरुण प्रविण शशिकांत सावंत (रा. कोळेगाव, वय ३२) या युवकावरती आपल्या चारचाकी MH10BG1002 या गाडीतून वेळापूरहून कोळेगावला जात असताना अकलूज सांगोला रोडवरील दुध डेअरीजवळ वडापाव घेण्यासाठी थांबला असता ही प्रकार घडला.
सायंकाळी सातच्या सुमारास मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. मात्र प्रविण शशिकांत सावंत हा यातून सुदैवाने बचावला. घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस घटनास्थळी पोहचले. अद्याप वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. Firing at Velapur on a youth from Kolegaon, fortunately the youth survived
□ अकलूज येथे औषध दुकानाची तोडफोड मालक जखमी; एकावर गुन्हा
सोलापूर – आईस्क्रीमचे पैसे घेतल्याच्या कारणावरून दुकानावर दगडफेक करुन केलेल्या मारहाणीत दुकानाचा चालक जखमी झाला. ही घटना अकलूज येथील वेलनेस मेडिकल येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
उमर इलाही खान (रा.बागवान गल्ली, अकलूज) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ऋषिकेश देव शेट्टी (रा.संग्रामनगर,अकलूज) याच्याविरुद्ध अकलूजच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ऋषिकेश शेट्टी याने दुकानाची तोडफोड केली. त्यात ५० हजाराचे नुकसान झाले. शिवाय त्याने दगडाने मारून उमर खान यांना जखमी केले, अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार मारकड पुढील तपास करीत आहेत .
□ तरंगफळ येथील सिद्धनाथ मंदिरात चोरी चांदीच्या तीन मूर्ती गायब
सोलापूर – तरंगफळ (ता.माळशिरस) येथील सिद्धनाथ मंदिरातील कपाटातुन चोरट्याने २ किलो वजनाच्या चांदीच्या ३ मूर्ती पळवले. ही धाडसी चोरी सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणामुळे भाविकात नाराजी पसरली आहे.
तरंगफळ येथे भगवान सिद्धनाथाचे मंदिर आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने उघड्या मंदिरात प्रवेश केला. आणि गाभाऱ्या जवळ ठेवलेल्या किल्ल्या घेऊन कपाट उघडले.त्यानंतर कपाटातील जोगेश्वरी देवीची, सिद्धनाथ आणि चांदीचा अश्व(घोडा) अशा एकूण ३ मुर्त्या पळविल्या. चोरीस गेलेल्या मूर्तीची किंमत ७० हजार इतकी असल्याची फिर्याद अर्जुन सदाशिव गेंड (रा. तरंगफळ) यांनी माळशिरस पोलिसात दाखल केली. हवालदार परांडे पुढील तपास करीत आहेत.
□ गावात बदनामी केली म्हणून महिलेस काठीने मारहाण
करोळे (ता.पंढरपूर) येथे तू गावात लोकांना माझ्याबद्दल काय सांगितले, ते लोक भांडायला माझ्या घरी आले. असे म्हणत घरात घुसून काठीने केलेल्या मारहाणीत वर्षाराणी अनिल अजगर (वय ३६) ही महिला जखमी झाली. ही घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात करकंबच्या पोलिसांनी विजय अंकुश पाटील (वय ४०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार सलगर पुढील तपास करीत आहेत.