बार्शी : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीमधील विशाल फटेची पोलिस कोठडी मंगळवारी संपली. त्याची आता 14 दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत रवानगी केली.
लोकांकडून घेतलेले 25 कोटी कोठे गेले, याचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने आता गुंतवणूकदार उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता अयशस्वी तपासाचे खापर कोणावर फुटणार ? याबाबत विचारणा केली जात आहे.
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून विशाल फटेने लोकांकडून गोळा केलेल्या 25 कोटी रुपयांचे काय झाले? याचा शोध लावण्यात आलेल्या अपयश आलेल्या ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या मागणीनुसार सत्र न्यायालयाने विशाल फटे यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यामुळे विशाल फटे प्रकरणाच्या पोलिस तपासाचा पहिला अध्याय आज संपला आहे.
गेल्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत जे लोकांना अगोदरच माहिती होते, त्यापेक्षा वेगळे काही पोलिस शोधू शकले नाहीत. त्यामुळे फटे प्रकरणातील तपासात आलेल्या अपयशाचे खापर कोणावर फुटणार, याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आपली गुंतवणूक परत मिळविण्यासाठी आणि फटे प्रकरणात सखोल, नि:ष्पक्ष तपास होण्यासाठी गुंतवणूकदार उच्च न्यायालयात जाणार आहेत.
Vishal Fateh’s police cell is over; Who will be blamed for the failed investigation? Stock market
The investor will go to the High Court
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
13 जानेवारी रोजी फटे कुटुंबियांविरोधात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील प्राथमिक
रक्कम 5 कोटी 63 लाखावरुन आता 25 कोटीच्या घरात पोहचली आहे. मात्र फटेकडून अटक होताना जप्त करण्यात आलेल्या 1 लाख 68 हजारापेक्षा अधिक रक्कम पोलिसांना जप्त करता आलेली नाही. फटेच्या संपत्तीची जी माहिती सर्वज्ञात आहे. त्याचीच माहिती सध्या तपासात संकलित झाली आहे.
विशाल फटेने अटकेपूर्वी केलेल्या व्हिडीओमध्ये आणि फिर्यादीमध्ये अनेक सहकार्यांचा आणि रकमा हस्तांतरीत केल्याचा उल्लेख होवूनही पोलिसांनी अद्याप इतर कोणाकडूनही फटेने दिलेली रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केलेला नाही. सहअरोपींपैकी वडील अंबादास व भाऊ वैभव यांना मिळालेल्या पाच दिवसाच्या पोलिस कोठडीतही त्यांच्याकडून उपयुक्त माहिती पोलिसांना मिळवता आली नाही. त्यामुळे गेल्या 17 दिवसांत पोलिसांनी नेमकं केलं काय? असा प्रश्न आता गुंतवणूकदारांना पडला आहे.
विशाल फटेकडून अद्यापपर्यंत प्राप्त झालेली रक्कम आणि दागिन्याची किंमत अत्यंत किरकोळ आहे. त्याच्या जंगम आणि चल मालमत्तेतूनही फारशी काही भरपाई होणार नाही. त्यामुळे त्याने आजपर्यंत हस्तांतरीत केलेल्या रकमांची वसुली होणे आवश्यक आहे. मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत त्या दिशेने पावले टाकलेली नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची आशा धूसर होत आहे.