मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. ऑफलाईनच ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य मंडळ ऑफलाईन परीक्षांवर ठाम आहे. परीक्षा ऑनलाईन घ्या, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली होती. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते.
कोरोनाच्या काळात घरातुन किंवा ऑनलाईन परीक्षा देण्याची सवय लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी आता शाळेत जावे लागणार आहे. कारण विद्यार्थ्यांनी घरातून परीक्षा दिल्याने त्यांची गुणवत्ता कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन वर्षापुर्वी ज्या पध्दतीने परीक्षा घेतल्या जात होत्या त्याचपध्दतीने यंदाच्या परीक्षा होतील असं पुणे बोर्डाने स्पष्ट केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
राज्यातल्या काही शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी चिथावणीला बळी पडून ऑनलाईन परीक्षेची मागणी केली. X-XII exam offline only
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मात्र सरकार ऑफलाईन परीक्षा offline exam घेण्यावर ठाम आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद Mumbai, Nagpur, Aurangabad यासारख्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षांची मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकारचा हा निर्णय मान्य नाही. कारण कोरोनामुळे यंदाचे दोन महिने वगळता मुलांचे दहावी, बारावीचे वर्ग भरले नाहीत. त्यात ऑनलाइन शिक्षणाची साधने नसणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचा बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आभ्यास झालेला नाही. असे असताना यंदा बोर्ड जर विद्यार्थ्यांची नियोजनानुसार व प्रचलित मूल्यमापन पद्धतीने परीक्षा घेणार असेल तर हे विद्यार्थ्यांसाठी अन्याय कारक होईल, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे वेगळंच मत आहे. परीक्षेमुळेच विद्यार्थी अभ्यास करतो. ऑनलाईन परीक्षा हे अभ्यास बंद करण्याचे माध्यम बनेल आणि विद्यार्थी निष्क्रिय बनेल. त्यामुळे त्याचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात, अशी मागणी काही विद्यार्थी करत आहेत.