Thursday, September 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

शेतकरी वाचवा अभियानातून 1 हजार नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना आत्मबळ

Surajya Digital by Surajya Digital
February 9, 2022
in Hot News, महाराष्ट्र, शिवार
0
शेतकरी वाचवा अभियानातून 1 हजार नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना आत्मबळ
0
SHARES
238
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नाशिक : नाशिकमध्ये काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत ‘शेतकरी वाचवा अभियान’ Save the Farmers Campaign राबवताना दिसत आहे. नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचं काम या अभियानातून केलं जात आहे. या अभियानामार्फत हजार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यासाठी त्यांनी शेतकरी समुपदेशन केंद्रही Farmer Counseling Center  उभारलं आहे. शेतकऱ्यांची न्यायालयीन प्रकरणामुळे, सावकराकडून घेतलेल्या कर्जामुळे खचलेल्या शेतकऱ्याला मदत केली आहे.

खचलेल्या, नैराश्याने ग्रासलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी, त्यांचे प्रश्न सुटावे याकरिता अभियान प्रयत्नशील असून आजवर हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या अभियानात समस्या मांडल्या. त्यावर शंका – समाधान मिळाल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत झालीय.

शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी जाणीव असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘शेतकरी वाचवा अभियान’ सुरू केले आहे. खचलेल्या, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळावा, त्यांच्याशी आपलेपणाने संवाद व्हावा, कर्जबाजारी, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्यासह शेतकऱ्याला आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास या माध्यमातून देण्यात येत आहे. हे काम नऊ वर्षांपासून अविरत सुरू आहे.

उपक्रमाच्या सुरुवातीला प्रकाश चव्हाण, राम खुर्दळ, राजू देसले, नाना बच्छाव यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी एकत्र येत गावागावांत शेतकरी संवाद सभा घेतल्या. ‘जागा हो बळीराजा, जागा हो’ या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे काम करताना शेतकऱ्यांचे प्रश्न हे शासकीय विभाग, कर्ज प्रकरणांशी अधिक संबंधित असल्याचे लक्षात आले. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागांशी संपर्क करत काम सुरू केले.

Self-empowerment of 1 thousand depressed farmers through Save Farmers Campaign

तुमचे आवडते  ‘लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल फेसबुक पेजवर lemon news, तर the lemon news नावाने ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध

गावपातळीवर दमलेल्या, खचलेल्या, कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये आत्मबळ यावे यासाठी २०१६ मध्ये मदतवाहिनी सुरू करण्यात आली. याशिवाय शेतकरी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी तसेच गावपातळीवर शेतकऱ्यांना या उपक्रमाची माहिती व्हावी यासाठी भित्तीपत्रक, चिकटपट्टीवर मजूकर छापण्यात आला. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि अडलेली कामे करून देण्यात कसोशीने प्रयत्न केले. न्यायालयाशी संबंधित अनेक प्रकरणे तडजोडीने मिटवली, सावकारांशी संबंधित प्रकरणांसाठी विधिज्ञ दत्ता निकम यांनी मदत केली.

अडचणींमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचे मार्ग निवडतात. त्यास अटकाव करण्यासाठी अभियानतर्फे काम सुरू करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात अभियानाच्या माध्यमातून शेतकरी आणि सरकार यात संवाद वाढावा, शेतकऱ्यांनी एकमेकांना मदतीसाठी हात द्यावा, शेतकऱ्यांमधील वाढते नैराश्य दूर व्हावे, गावातील लोककला आणि लोकमाध्यमांचे जतन संवर्धन व्हावे, कलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपले दु:ख विसरून संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळावे यासाठी काम करण्यात येत आहे.

शेतकरी बांधवांसाठी गिरणारे येथे माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चार गरीब कुटूंबांना शासकीय मदतीसाठी पाठपुरावा केला. शेतकऱ्यांचे न्यायालयीन, स्थानिक वाद मिटावे म्हणून कायदेशीर शिबिरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. त्यात अनेक वाद स्थानिक पातळीवरच मिटवले. वाढती व्यसनाधीनता, नैराश्य दूर व्हावे म्हणून नाटिका, एकपात्री प्रयोग, गाणी याद्वारे प्रबोधन करण्यात आले. गावपातळीवर पाणीटंचाई जाणवत असताना ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, प्राचीन जलस्रोत संवर्धनासाठी सध्या जागृती करण्यात येत आहे.

□ कोरोनाकाळात मदतीचा हात

शेतकरी मदतवाहिनीवर आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या अगदी आपलेपणाने ऐकून कोरोना काळात त्यांच्या मदतीला धावून जाण्याचे काम केले आले. दीड वर्षात ४७ हून अधिक शेतकऱ्यांना अशा प्रकारे साहाय्य करण्यात आले. आत्महत्येच्या विचाराने घर सोडलेल्या व्यक्तींना जगण्याचा विचार देऊन त्या शेतकऱ्याला त्याच्या घरी पोहोचविण्यात आले. याबाबत प्रशासकीय पातळीवर मात्र उदासीनता जाणवत असल्याची खंत राम खुर्दळ यांनी व्यक्त केली.

कोरोनाकाळात व्यवहार ठप्प असताना या अभियानाच्या वतीने आदिवासी शेतकऱ्यांना किराणा, ७०० विधवांना मदत, मच्छरदाणी, सॅनिटायझर आदी सामानांचे वाटप करण्यात आले. लोककलावंतांसाठी मदतीचा हात पुढे केला. सद्य:स्थितीत पेठ तालुक्यातील ५० गावांना टंचाई जाणवत आहे. पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी गावांचा पाणीप्रश्न सुटण्याची गरज आहे. त्यासाठी अभियान काम करत आहे.

 

Tags: #Self-empowerment #depressed #farmers #Save #Farmers #Campaign#शेतकरी #वाचवा #अभियान #1हजार #नैराश्यग्रस्त #शेतकरी #आत्मबळ
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Next Post

पंढरपुरात पकडले  8 लाखांचे चंदन,  दोन आरोपींना अटक

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंढरपुरात पकडले  8 लाखांचे चंदन,  दोन आरोपींना अटक

पंढरपुरात पकडले  8 लाखांचे चंदन,  दोन आरोपींना अटक

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

February 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28  
« Jan   Mar »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697