पंढरपूर : पंढरपूर पोलीस व वनविभागास 8 लाखांचे चंदन पकडण्यात यश आले आहे. यात दोन आरोपींना अटक केली आहे.
सुगंधी चंदनाची ओली लाकडे कारमधून वाहतूक करणार्या दोघांवर पंढरपूर तालुका पोलिस व वनविभागाने मंगळवारी रात्री (ता. 8) कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी 132 किलो 900 ग्रॅम सुगंधी चंदन व कार असा एकूण 12 लाख 97 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वनपाल एस.एस.पतकी, वनरक्षक एस.डी.कांबळे यांनी सर्व मालाची पाहणी करुन पंचनामा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर – मोहोळ रोडवरील तीन रस्ता याठिकाणी वाहन तपासणीदरम्यान सिल्व्हर रंगाची इर्टीका कार (एम.एच 42 के 7611) मध्ये पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे आढळून आली. यामध्ये एकूण चार नायलनच्या पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे 132 किलो 900 ग्रॅम (एकुण किंमत 7 लाख 97 हजार 400 रुपये) व एक सिल्व्हर रंगाची एरटिका कार 5 लाख) असा एकूण 12 लाख 97 हजार 400 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
8 lakh sandalwood seized in Pandharpur, two accused arrested
यामध्ये चालक रमेश महादेव तेलंग (वय 25 वर्षे रा.तुंगत ता.पंढरपूर जि.सोलापूर), कचरुद्दीन अल्लामीन जमादार (वय 35 वर्षे, रा.पेनुर ता.मोहोळ जि.सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. या दोघंवर भादवि कलम 379, 34 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42, 66, 66 (अ) व महाराष्ट्र नियमावली 2014 नियम 82 व महाराष्ट्र अधिनियम कलम 29 प्रमाणे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ घरमालकांना द्यावी लागणार भाडेकरूंची माहिती; पोलिस आयुक्तांचे नवे आदेश
सोलापूर : विध्वंसक किंवा समाजविघातक लोक (घटक) शहरातील निवासी भागात लपून बसू शकतात, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यांच्यामुळे शांतता भंग अथवा खासगी, सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक घरमालकांनी त्यांच्या जागेत अथवा मालमत्तेत भाड्याने राहणाऱ्यांची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला द्यावी, असे आदेश पोलिस आयुक्त हरिष बैजल यांनी काढले आहेत.
घरमालकांनी त्यांच्या मालमत्तेची खरेदी- व्रिकी झाल्यानंतर अथवा भाड्याने दिल्यानंतर समोरील व्यक्ती कोण आहे, याचीही माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यावेळी त्या व्यक्तीचे नाव, त्याचे राष्ट्रीयत्व, पासपोर्ट, व्हिसा क्रमांक श्रेणी, ठिकाण, नोंदणीचे ठिकाण अशी कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. तसेच तो व्यक्ती शहरात कोणत्या कामानिमित्त राहायला आला आहे, याचे कारणही पोलिसांना द्यावे लागणार आहे.
हा आदेश 5 एप्रिलपर्यंत लागू राहणार असून या कालावधीत संबंधित घरमालकांनी शहरातील त्यांच्या परिसरातील पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिस आयुक्तांनी त्यांच्या आदेशातून केले आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील, हा त्यामागील हेतू आहे.