मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय उभारलं जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागेत हे संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आजच्या मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
An international music college will be set up in Mumbai in the name of Latadidi
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन लता दिदींच्या हस्ते होणार होते मात्र, दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. परंतु, लता दिदींचे स्वप्न पूर्ण करणार आहे. आज मंगेशकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी, उषाताई, आदिनाथ जी, मयूरेश पै उपस्थित. pic.twitter.com/D9zgQ34RKa
— Uday Samant (@samant_uday) February 8, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘माझ्या विभागाने मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय सुरु करण्याचे ठरवले होते याचे मला समाधान आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी लतादीदी यांचे निधन झाले. आता भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असे नाव दिले जाणार आहे. संगीत महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठातील जागा द्यावी अशी शिफारस करण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खूप इच्छा होती. पण आता जमीन मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागेत हे संगीत महाविद्यालय उभारले जाणार आहे. त्या महाविद्यालयाला भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे नाव दिले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या दृष्टीने तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्याचेही सामंत यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या नावे आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात हे संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. कलिना परिसरातील 2.5 एकर जागेवर 1200 कोटी रुपये खर्च करून हे संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
”आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे दिदींचे स्वप्न होते, परंतु वेळेत जागा उपलब्ध न झाल्याने ते पूर्ण होऊ शकलं नाही. यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्याच समितीने आता या महाविद्यालयाला लता दीनानाथ मंगेशकर नाव देण्याचा प्रस्ताव दिला होता,”
– उदय सामंत , मंत्री