मोहोळ : भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसास शिवीगाळी दमदाटी करीत गच्ची धरून ढकलून दिल्याने याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वाळूज (ता. मोहोळ) येथे आम्हाला किराणामाल का देत नाही, या कारणावरून कुरुल येथील किराणा व्यापारी बाळासाहेब लिगाडे व त्यांच्या तीन कामगारांना वाळूज येथील दुकानदार रामचंद्र बळीराम बुद्रुक, सतीश मधुकर मोटे, तेजश्री रामचंद्र बुद्रुक व इतर दोन महिलांनी टेम्पोच्या काचा फोडीत त्यावर डिझेल ओतून मारामारी व शिवीगाळी केली. Mohol: A case has been registered against three persons, including a woman, for assaulting a police constable
ही माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली होती. यानुसार बीट अंमलदार गणेश पोफळे, पोलीस नाईक समाधान पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धर्मे हे तिघेजण घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी सुरू असलेली भांडणे सोडवा सोडवी करत असताना यातील रामचंद्र बुद्रुक, सतीश मोटे व तेजश्री बुद्रुक यांनी टेम्पो मालक बाळासाहेब लिगाडे यांना दमदाटी करीत आम्हास मारण्यासाठी पोलीस घेऊन आलात का?, आमचे कोणीही वाकडे करीत नाही, असे म्हणत भांडण सोडवासोडवी करणाऱ्या पोलीस नाईक समाधान पाटील यांना रामचंद्र बुद्रुक यांनी गच्ची धरून ढकलून दिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बीट अंमलदार गणेश पोकळे यांना तू तर या रस्त्याने गावाकडे कसा जातो व या हद्दीत कसे काम करतो, तेच पाहतो असे म्हणत शिवीगाळ करून धमकी दिली.
अशा आशयाची फिर्याद पोलीस नाईक समाधान पाटील यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार पोलिसांनी रामचंद्र बळीराम बुद्रुक, सतीश मधुकर मोटे व तेजश्री रामचंद्र बुद्रुक अशा तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशितोष चव्हाण हे करीत आहेत.
□ ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेमुळे मोटारसायकलस्वार जखमी
बार्शी : बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावरील खांडवीनजीक शेतातून अचानक रस्त्यावर आलेल्या ट्रॅक्टरची धडक बसून मोटारसायकलस्वार तेजस प्रभुचंद्र अंधारे (रा.येडाई विहीर,वाडकर प्लॉट, बार्शी ) हा जखमी झाला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टरचालक किरण भास्कर गव्हाणे (रा. खांडवी ता. बार्शी) याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तेजस अंधारे हा कुरीयर डिलिव्हरीचे काम करतो. तो सकाळी आपल्या कामानिमित्त मोटारसायकलीवर खांडवी येथे गेला होता. तेथून 11.30 वा. शेंद्रीकडे जात असताना खांडवी गावाच्या पुढे बार्शी कुर्डुवाडी रोडलगत असलेल्या सिंमेट पाईप कारखान्यानजिक अचानक डाव्या बाजूने शेतातून एक ट्रॅक्टर भरधाव वेगात आला.
त्याने माझ्या मोटारसायकलीस डावे बाजूने धडक दिल्याने ते मोटारसायलसह रोडवर खाली पडून जखमी झाले. तो ट्रॅक्टर किरण गव्हाणे चालवत होता. या अपघातात मोटारसायकलची मोडतोड होऊन 25 हजाराचे व मोबाईल फुटून 7 हजाराचे नुकसान झाले. अपघातानंतर वैद्यकीय मदत न पुरविता किरण गव्हाणे तेथून ट्रॅक्टर घेवून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.