पुणे : पुणे शहरात Pune city सैन्य दलातील 24 वर्षीय जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरख शेलार gorakh shelar असे आत्महत्या suicide केलेल्या जवानाचे नाव आहे. पत्नीला आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी जवानाच्या पत्नीसह एकूण 5 जणांवर गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोरख हा सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट narsing assistant पदावर एएफएमसीमध्ये तो कार्यरत होता.
गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. शेलार यांनी रविवारी (ता. ६) वानवडी येथील एएफएमसी सैनिक अवासात आत्महत्या केली. या प्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगीता युवराज पाटील, योगेश युवराज पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. नंदुरबार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत केशव नानाभाऊ पाटील (शेलार) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Army personnel commit suicide in Pune; Crime against five including wife
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बंधू गोरख शेलार हे भारतीय सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी त्याचा अश्विनी पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत खटके उडू लागले. अश्विनी ही शेलार यांना वारंवार मानसिक त्रास देत. तसेच त्यांना नोकरी घालविण्याची धमकी देत होती.
गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याची धमकी देऊन तुझ्यासह आणि तुझ्या परिवारावर गुन्हा दाखल करण्याची धमकी पत्नीने शेलार यांना वारंवार दिली होती. तसेच पत्नीला सोडचिठ्ठी देण्यासाठी व पंधरा लाख रुपये देण्याची मागणी करीत शेलार यांना छळण्यात आले. याच जाचाला कंटाळून शेलार यांनी आत्महत्या केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते करीत आहेत.