सोलापूर – कर्नाटक राज्यात हिजाबच्या नावे मुस्लिम विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक शासनाचा आज सोलापुरात कडक निषेध केला. आंदोलना दरम्यान माजी आमदार आडम मास्तरांसह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळेस गगनभेदी घोषणा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व माकप जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केले.
माजी आमदार नरसय्या आडम मास्तर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने मुस्लिम विद्यार्थिनींचा हिजाबसारख्या प्रकरणावरून सामाजिक छळ होणार नाही, येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची हमी घेतली पाहिजे. हिजाब घेणाऱ्या फातिमा शेख यांच्या साह्याने डोक्यावर पदर घेतलेल्या सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रात सर्व जातीधर्मांच्या मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला. या परंपरेला छेद लावू पाहणाऱ्या समाजविघातक मनुवादी प्रवृत्तींचा महाराष्ट्र शासनाने कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घेऊन वर्गात बसणे हा त्यांचा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक अधिकार आहे. भाजपशासित कर्नाटक राज्यात समाजात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी विद्यार्थिनींवर हिजाबबंदी घातली जात आहे. विविध समाजात वेगवेगळ्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आहेत. ते समाज सार्वजनिक जीवनात त्यांचे पालन करत असतात. त्यामुळे दुसऱ्या परंपरा मानणाऱ्यांवर कसलाही अन्याय होत नाही. मुस्लिमांना आधुनिक शिक्षणव्यस्थेतून बहिष्कृत करून रास्व संघ आणि भाजप मनुवादी विचारसरणीचा अवलंब करत असल्याचाही आरोप केला.
Hundreds of activists, including former MLA Adam Master, were detained
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या शिक्षणात विघ्न आले, त्यानंतर रास्व संघ विचाराच्या कुणा तथाकथित ’हिंदुस्तानी भावाने’ विद्यार्थ्यांना चिथावण्याचा प्रयत्न करून बहुजनवर्गातील विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. महाराष्ट्रातील तरूणांची मने दूषित करणाऱ्यांच्या कारवाया शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, महर्षि वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.
यावेळी शहापूर चाळ येथून तिरंगा झेंडा घेऊन मोर्चा निघाला तो सहस्रर्जुन मंगल कार्यालय मार्गे यशोधरा हॉस्पिटल येथून पूनम गेट येथे मोर्चा दाखल झाला. यानंतर आडम मास्तर यांनी पक्षाची भूमिका मांडले.पोलिसांनी आडम मास्तर यांच्या सह शेकडो महिला व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळेस नगरसेविका कामीनी आडम,नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख,युसूफ मेजर,व्यंकटेश कोंगारी,सुनंदा बल्ला, सिध्दप्पा कलशेट्टी,शेवंता देशमुख, शकुंतला पानिभाते,फातिमा बेग, विक्रम कलबुर्गी,अनिल वासम,दाऊद शेख,अकील शेख,विल्यम ससाणे, नरेश दुगाने, मुरलीधर सुंचू,बापू कोकणे,दीपक निकबे, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे,दत्ता चव्हाण, इलियास सिद्दीकी आदी उपस्थित होते.
679814 88295I merely must let you know that you have written an superb and unique article that I actually enjoyed reading. Im fascinated by how properly you laid out your material and presented your views. Thank you. 996706