अमरावती : ठाकरे सरकारचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दोन महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली.
बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील आपली संपत्ती लपवणे बच्चू कडूंना महागात पडल्याची चर्चा आहे. अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी कडूंविरोधात तक्रार दाखल केली होती.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला. Thackeray’s minister Bachchu Kadu sentenced to 2 months rigorous imprisonment
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे.
यात बच्चू कडू विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते, यात तब्बल पाच वर्षा नंतर चांदुरबाजार येथील न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरुद्ध निकाल देत त्यांना 2 महिने सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंड दिला आहे, तर बच्चू कडू यांनी जनतेची दिशाभूल केली आणि चुकीची माहिती दिल्याने त्यांच विधानसभा सदस्यपद रद्द करा अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी दिली.
विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. यात न्यायालयाने बच्चू कडू यांना जामीन सुद्धा दिली आहे. या नंतर बच्चू कडू यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणले आहे.