Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पंढरीत सुमारे तीन लाख भाविक दाखल; अनेक महिन्यानंतर पुन्हा विठ्ठलनगरी दुमदुमली

Surajya Digital by Surajya Digital
February 12, 2022
in Hot News, सोलापूर
0
पंढरीत सुमारे तीन लाख भाविक दाखल; अनेक महिन्यानंतर पुन्हा विठ्ठलनगरी दुमदुमली
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पंढरपूर (बजरंग नागणे) : माघी शुध्द जया एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी तर रुक्मिणी मातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. अनेक महिन्यानंतर पुन्हा विठ्ठलनगरी दुमदुमली आहे.

माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे तीन लाख भाविक दाखल झाले आहेत. माघी एकादशी निमित्त मंदिरात विविध फुलांची आरास करण्यात आली आहे. यामध्ये झेंडू, शेवंती, जरबेरा अशा विविध जातींच्या एकूण 1 टन फुलांची आरास करण्यात आली आहे. यावेळी मंदिर समितीच्या दिनदर्शिकेचे व डायरीचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंदिर समितीचे सह – अध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, प्रकाश महाराज जवंजाळ, अतुशास्त्री भगरे, शकुतंला नडगिरे, माधवी निगडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

About three lakh devotees admitted in Pandharpur; After many months, Vitthalnagari was in full swing again

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

माघी एकादशीला राज्यातील इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सुमारे तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व मंदिर समितीच्या वतीने वारकरी व भाविकांसाठी आवश्यक उपाययोजना तसेच सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांनी मास्क बंधनकारक केले असून, रांगेतील भाविकांना मंदीर समितीच्या वतीने चहा, स्वच्छ पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधेबरोबरच 65 एकर, नदीपात्र, प्रदक्षिणामार्ग, मंदीर परिसर व शहरातील इतर ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठह कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. माघी एकादशी निमित्त भाविकांनी चंद्रभागा स्नान,नगरप्रदक्षिणा, कळस दर्शन तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले.

मंदिर, चंद्रभागा वाळवंट परिसरासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

एकादशी निमित्त दुपारपर्यंत दर्शन रांग पत्राशेडच्या पुढे पोहचली होती. दर्शन रांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मुखदर्शनासाठी सुमारे सहा ते सात तास वेळ लागत आहे. चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, 65 एकर भाविकांसह टाळ मृदूंगाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.

माघी यात्रेकरिता आलेल्या भाविकांना चंद्रभागा स्नान करता यावे, म्हणून नगरपालिकेच्या उपबंधाऱ्यातून  पाणी सोडण्यात आले आहे. याकरिता बंधारा अर्धा मीटर उघडण्यात आला आहे. चंद्रभागेमध्ये भाविकांची स्नानाची सोय होणार असून, भाविकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.

 

Tags: #threelakh #devotees #admitted #Pandharpur #manymonths #Vitthalnagari #full #swing #again#पंढरपूर #तीनलाख #भाविक #दाखल #विठ्ठलनगरी #दुमदुमली
Previous Post

अकलूजमध्ये भरदिवसा साडेसात लाखाची बॅग पळविली

Next Post

पद्मभूषण, दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांचे पुण्यात निधन

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पद्मभूषण, दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांचे पुण्यात निधन

पद्मभूषण, दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांचे पुण्यात निधन

वार्ता संग्रह

February 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28  
« Jan   Mar »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697