लखनौ : उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका लग्नसोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या विहिरीवरील सुरक्षा जाळीवर काही महिला आणि मुली उभ्या होत्या. त्यानंतर महिलांच्या वजनाने लोखंडी जाळी तुटली आणि जाळीवर उभ्या असणाऱ्या महिला एकत्र विहिरीत पडल्या. या घटनेत १३ महिला विहिरीत पडल्या असून ११ महिलांचा बुडून मृत्यू झाला तर २ महिला गंभीर जखमी आहेत.
या घटनेत आतापर्यंत सुमारे १३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले व त्यातील किमान १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत पूजा यादव नावाच्या तरुणीने मृत्युपूर्वी पाच जणांचे प्राण वाचवले. मात्र, लष्करात जाण्याचे तिचे स्वप्न नियतीने हिरावले.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून मदत आणि बचावकार्य तत्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमींवर वेगवान उपचार होतील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. अधिक माहिती अशी की, नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. The marriage collapsed at home; 11 women drowned in well
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक करून विहिरीत कोसळल्या.
एकूण १३ महिला या विहिरीत कोसळल्या. त्यात दोन मुलींचाही समावेश होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. विहिरीतून महिलांचा किंचाळण्याचा आवाज येते होता.
मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आणि स्थानिकांनी या महिलांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत १३ महिलांचा बुडून मृत्यू झाला.
नेबुवा नौरंगिया गावातील परमेश्वर कुशवाह यांचा मुलगा अमितच्या हळदीचा विधी पार पडला. घरापासून जवळ स्लॅब टाकलेल्या विहिरीवर हा कार्यक्रम सुरू होता. विहिरीच्या स्लॅबवर जास्त भार पडल्यामुळे तो कोसळला आणि त्यावर असलेल्या २० ते २५ महिला एकाच वेळी विहिरीत पडल्या. स्थानिकांनी तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले.
पाठोपाठ स्थानिक प्रशासन तसेच अग्निशमन विभागाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य करून विहिरीतून १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भीषण दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून, मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे.