भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूरमधील अमन पांडे या सायबर संशोधक तरुणाने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममधील 232 कमतरता शोधून काढल्या आहेत. त्यामुळे गुगलने त्याला 65 कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. तसेच त्याच्या संशोधनाला सर्वोत्तम संशोधनाचे बक्षीस दिले आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ग्राहकांना सायबर गुन्ह्यांचा धोका अधिक असल्याने अमनने याच्यावर संशोधन केलं होतं.
युजर्सला सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी सायबर तज्ञ कार्यरत असतात. अशातच या अमन नावाच्या सायबर तज्ञाने अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीममधील कमतरता शोधून काढल्या आहेत. त्याच्या संशोधनाबद्दल त्याला गुगलने 8.7 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 65 कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. अमन पांडे असे या सायबर तज्ञाचे नाव आहे. त्याने 2021 या वर्षामध्ये गुगलच्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीममधील 232 बग्ज शोधून काढले आहेत.
गुगलकडून मिळालेल्या या रकमेचा वापर अमन कंपनीच्या प्रगतीसाठी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमन पांडे याच्या बग्जमिरर या कंपनीचा मुख्य उद्देशच प्रत्येकाला सायबर सुरक्षा धोक्यांपासून संरक्षण देणं आणि स्मार्टफोन,पीडीए (PDA) किंवा कोणतंही आयओटी (IoT) डिव्हाइस मालवेअर आणि व्हायरसपासून मुक्त राहील याची खात्री करणं असा आहे. त्यामुळेच सध्या त्याचे संपूर्ण लक्ष अँड्रॉइडवर आहे. Found flaws in the Android operating system; Google gives Rs 65 crore to youth
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गुगलने आपल्या अहवालात इंदूरच्या अमन पांडे याचा विशेष उल्लेख केला. बग्ज मिरर टीमचे अमन पांडे हे गेल्या वर्षी आमचे सर्वोच्च संशोधक होते, अशा शब्दांत गुगलने अमन यांचे कौतुक केले. अमनने भोपाळ एनआयटीमधून बीटेक केले आहे. बग्ज मिरर कंपनीचा तो संस्थापक आहे.
त्याचा 15 जणांचा स्टाफ आहे. त्याचे वडील स्टेशनरी दुकान चालवतात. अमनची कंपनी गुगल, ॲपल आणि अन्य कंपन्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत बनवण्यात मदत करते. त्याच्या पंपनीने 2019 मध्ये पहिला अहवाल दिला. तेव्हापासून त्याने अँड्रॉईड व्हल्नेरेबिलिटी रिवॉर्ड प्रोग्रॅमसाठी (व्हीआरपी) 280 हून अधिक व्हल्नेरेबिलिटी नोंदवल्या आहेत.
अमनने बग्ज मिरर ही कंपनी एक स्टार्टअप म्हणून सुरू केली होती. अमनने सांगितले की, कंपनी जानेवारी 2021 मध्ये सुरू झाली आहे. मुख्य उद्देश सायबर सुरक्षा धोक्यांपासून संरक्षण देणे आणि स्मार्टफोन किंवा अन्य डिव्हाईस हे मालवेयर किंवा व्हायरसपासून मुक्त करणे हाच आहे.
दिवसेंदिवस डिजिटल क्षेत्र अधिक व्यापक होत आहे. त्याच वेगाने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. सायबर सुरक्षा हा या क्षेत्रातील कंपन्यांचा चिंतेचा सर्वात मोठा विषय आहे. युजर्सला सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी सायबर तज्ञ प्रयत्नशील असतात. अशातच यासाठी मदत होणार आहे.
554679 357538I like the valuable information you give within your articles. Ill bookmark your weblog and check again here regularly. Im quite certain Ill learn numerous new stuff proper here! Very good luck for the next! 622434