बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धनंजय मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी केली. पण अवघ्या 11 धावानंतर ते क्लीन बोल्ड झाले. मुंडे यांनी दोन चौकारासह अकरा धावा चोपल्या. कैलासवासी पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ परळीत सरपंच प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा फलंदाजी करताना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. धनंजय मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. पण अवघ्या 11 धावानंतर ते आऊट झाले. राजकीय मैदानात चौकार-षटकार मारणारे धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून फलंदाजी केली. धनंजय मुंडे यांनी दोन चौकारासह अकरा धावा चोपल्या. त्यानंतर ते क्लीन बोल्ड झाले.
कैलासवासी पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ परळीत सरपंच प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. परळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेवेळी धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती.
Dhananjay Munde hit 11 runs with 2 fours
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
धनंजय मुंडे यांना यावेळी फलंदाजी करण्याचा मोह आवरता आला नाही. धनंजय मुंडे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. त्यांनी दोन खणखणीत चौकार लगावले. पण त्यानंतर ते क्लीन बोल्ड झाले.
परळी शहरामध्ये आयोजित केलेल्या सरपंच प्रीमियर क्रिकेट लीगच्या उपांत्य फेरीचा आज शनिवारी सामना होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. फक्त हजेरीच लावली नाही तर स्वतः बॅट घेऊन मैदानात उतरले. धनंजय मुंडे यांनी यावेळी सात चेंडूचा सामना केला. यामध्ये दोन वेळा चेंडूला सीमारेषाबाहेर लावले. धनंजय मुंडे यांनी 11 धावा केल्या. पण त्याचवेळी एका यॉर्कर चेंडूवर ते क्लीन बोल्ड झाले. धनंजय मुंडे फलंदाजी करत असताना उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिली. दोन चौकार लगावल्यानंतर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत चांगलीच दाद दिली.
दरम्यान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा एक मार्चपासून शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून सुरू करण्यात याव्यात असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शाळा सुरू केल्या जातील, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.