कुर्डूवाडी : पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या ट्रॅक्टर यार्डमध्ये ट्रॅक्टर नंबर लावण्याच्या कारणावरुन मारहाण झाली. यात चौघाजणांच्याविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला.
चौघाजणांनी जातीवाचक बोलून टाॅमी, लाथाबुक्क्याने, शिवीगाळ व दमदाटी करत एका चालकास मारहाण करुन गंभीर दुखापत केल्याने चैघां जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.१९ ) स.११.३० वा सुमारास विठ्ठलराव कारखाना यार्ड परिसरात घडली. याबाबत ज्योतीराम उर्फ बापू वाल्मिक लोंढे रा. पिंपळनेर ता.माढा यांच्या फिर्यादीवरुन चौघाजणांच्याविरोधात ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राहुल उर्फ प्रताप पोपट खटके, स्वप्नील कालिदास खटके,सुदर्शन उर्फ बालाजी खटके सर्व (रा.तांबवे, सुभाष ठेंगल रा.मिटकलवाडी) या चौघांविरोधात ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी ट्रॅक्टर चालक हे उंदरगाव (ता.माढा) येथून दोन उसाने भरलेल्या ट्राॅल्या घेऊन विठ्ठलराव शिंदे कारखाना येथे उस खाली करण्यासाठी गेला असता यार्डमध्ये नंबर लावला. यावेळी माझ्या ओळखीचा सुभाष ठेंगल हा ट्रॅक्टर ड्रायव्हर उसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन माझ्या ट्रॅक्टरच्यापुढे येऊन मधे लावला. फिर्यादी त्याला तुझा ट्रॅक्टर नंबरने घेऊन ये असे म्हणताच सुभाष ठेंगल म्हणाला ट्रॅक्टर कोणाचा आहे माहिती नाही का असे म्हणून त्याने फोन करुन तिघांना बोलावून घेतले. जातीवाचक शब्द वापरून मारहाण करुन दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Beating for numbering factory in Kurduwadi; Atrocity on all fours
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ गिर्हाईकाला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण ; सहा जणांवर गुन्हा
सोलापूर : गिर्हाईकाला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी, १९ फेब्रुवारी रोजी साई बाबा चौक गणेश मंदिर जवळ सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी अनिल विठ्ठल जाधव (वय-४०,रा.साई बाबा चौक, गणेश मंदिर,सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संदीप बंदपट्टे, शोभा बंदपट्टे, अबू बंदपट्टे, शिवा बंदपट्टे, अम्मी बंदपट्टे, लक्ष्मी बंदपट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी त्यांची भाची राजश्री साळुंखे व भाऊ बाशा जाधव, वहिनी संगीता जाधव असे म्हणून घराच्या बाहेरील कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी दोघे अज्ञात इसमांनी सिंधी पिऊन येऊन उलट्या केल्या, तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना तू आमच्या घरासमोर का उलट्या केल्या, असे म्हणाले असता त्या दोन्ही इसमांनी संदीप बंदपट्टे यांना जाऊन सांगितले.
त्यानंतर या सर्वानीच फिर्यादी यांना तुम्ही माझ्या गिर्हाईकाला का शिवीगाळ केली. या कारणावरून शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी तसेच प्लास्टिकच्या पाईप ने मारहाण केली. फिर्यादी यांच्या भावाला व वहिनीला किरकोळ जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली. पुढील तपास पोलिस नाईक चव्हाण हे करीत आहेत.