मुंबई : मुंबईत दादासाहेब फाळके (21 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यात पुष्पा: द राइज (फिल्म ऑफ द ईयर), शेरशाह (सर्वोत्कृष्ट चित्रपट), रणवीर सिंग (सर्वोत्कृष्ट अभिनेता), क्रिती सेनन (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), मनोज वाजपेयी (वेब सिरीज सर्वोत्कृष्ट अभिनेता), रवीना टंडन (वेब सिरीज सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) आणि अनुपमा मालिका ‘टेलीव्हिजन सिरीज ऑफ द इयर’ ठरली आहे.
दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळा रविवारी (20 फेब्रुवारी) मुंबईत होणार आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री यांसह सर्वोत्कृष्ट चित्रपटांना दादासाहेब पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ‘पुष्पा’ या चित्रपटाला फिल्म ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला. 17 डिसेंबर 2021 रोजी हा चित्रपट प्रर्दशित झाला असून या चित्रपटाने कमी काळात कोट्यवधींचा टप्पा पार केला होता.
बॉलिवूड मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराचा मानकरी ‘रणवीर सिंह’ ठरला असून रणवीरला ’83’ या चित्रपटातील अभिनयामुळे हा पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं अजूनही कौतुक केलं जातं. अभिनेत्री ‘कृति सेनन’ हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. ‘मिमी’ या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे हा पुरस्कार देण्यात आला असून तिने या चित्रपटात सेरोगेट आईची व्यक्तिरेखा साकारली होती. Dadasaheb Phalke Award 2022, ‘Pushpa’ and ’83’
https://twitter.com/S_N_Shaikh/status/1495713775265402881?t=8a5ADXcGOkjFVuFjmVj85w&s=19
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या पुरस्कार सोहळ्याला आशा पारेख (Asha Parekh), लारा दत्ता (Lara Dutta), सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra), कियारा आडवाणी (Kiara Advani),अहान शेट्टी (Ahan Shetty) , सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी हजेरी लावली होती. चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनेत्री क्रिती सेननला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता रणवीर सिंहला देखील 83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
□ दादासाहेब फाळके पुरस्कार 2022, पहा विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट- शेरशाह सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंह सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कृति सेनन सर्वोत्कृष्ट पदार्पण- अहान शेट्टी फिल्म ऑफ द इयर- पुष्पा द राइज सर्वोत्कृष्ट वेब सीरीज- कँडी सर्वोत्कृष्ट अभिनेता (वेब सीरीज)- मनोज बाजपेयी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (वेब सीरीज)- रवीना टंडन सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- विशाल मिश्रा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- कनिका कपूर सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म- पाउली बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म- अनादर राउंड सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- केन घोष सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- जयाकृष्ण गुममड़ी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सतीश कौशिक सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- लारा दत्ता सर्वोत्कृष्ट खलनायक- आयुष शर्मा पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता- अभिमन्यु दासानी पीपल्स च्वाइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राधिका मदान टेलिविजन सीरियल ऑफ द इयर- अनुपमा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टिव्ही- शाहीर शेख सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टिव्ही- श्रद्धा आर्या मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर टिव्ही सीरियल- धीरज धूपर मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्ट्रेस टिव्ही सीरियल- रुपाली गांगुली क्रिटिक बेस्ट फिल्म- सरदार उधम क्रिटिक बेस्ट ॲक्टर- सिद्धार्थ मल्होत्रा क्रिटिक बेस्ट ॲक्ट्रेस- कियारा आडवाणी