मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जातीयवादावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पाटील म्हणाले, ‘समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. कधी ते मराठे विरुद्ध नॉन मराठे असा विषय सुरू करतात तर कधी ते अल्पसंख्याक विरुद्ध नॉन अल्पसंख्याक असा वाद सुरू करतात. मुस्लिम समाजालाही हे माहीत आहे की हे सर्व मतांसाठी सुरू आहे. ‘
शरद पवार यांचा समाजामध्ये जातीवाद करण्याचा नेहमीच प्रश्न राहिला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सरकार संघर्ष पेटला आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याच्या तारखा जाहीर करत आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो. Malik should resign, otherwise agitation; Sharad Pawar always tries to create casteism in the society
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
चंद्रकांत पाटलांना दिशा सलियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील. दूध का दूध, पानी का पानी होईल. कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल? हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.
पाटील म्हणाले, कॅबिनेट मंत्री म्हणून पदावर राहण्याचा नवाब मालिक यांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकर नाही. त्यांनी आता तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु. आता कशाची वाट पहाताय? असा सवालही त्यांनी मलिक यांना केला आहे.
महाविकास आघाडीतील इतर मंत्र्यांवरही आरोप करताना पाटील म्हणाले, एका मंत्र्यानं महिला अत्याचारप्रकरणी राजीनामा दिला आहे. तर दुसऱ्या एका मंत्र्याच्या दोन बायका आहेत जे हिंदू कोड बिलामध्ये बसत नाही. या सरकारने घटना पायदळी तुडवली याची 22 पानी नोट तयार आहे. अटकेनंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना ‘लढेंगे और जितेंगे’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, ज्या प्रकारची नवाब मलिकांची देहबोली आहे, याला आमच्याकडे ग्रामीणभाषेत कोडगेपणा म्हणतात.
■ मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आंदोलन करु
#ChandrakantPatil #आंदोलन #मुख्यमंत्री #सुराज्यडिजिटल #CM #surajyadigital
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असं पाटील म्हणाले.