Wednesday, May 25, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अक्कलकोट : टायर फुटून जीप दुचाकीवर आदळल्याने मामा – भाचे ठार

Surajya Digital by Surajya Digital
February 26, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
1
अक्कलकोट : टायर फुटून जीप दुचाकीवर आदळल्याने मामा – भाचे ठार
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट : रेल्वे स्टेशन ते अक्कलकोट दरम्यान पेट्रोल पंपासमोर क्रूझर जीपचे टायर फुटून समोरून येणाऱ्या मोटारसायकलवर जीप जोरदार आदळल्याने दुचाकीवरील कर्नाटकातील मामा-भाचे जागीच ठार झाले. शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला.

भाचा गुरप्पा जंगप्पा ग्वलर (वय – २८, रा.सालोटगी, कर्नाटक) व मामा जंगप्पा भीमशा सावळे (वय ६०, रा. आळंद, जि. कलबुरगी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दक्षिण पोलीस ठाण्यात अज्ञात क्रूझर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून अपघातानंतर चालक गाडी सोडून पसार झाला.

 

गुरप्पा व त्याचे मामा जंगप्पा हे मोटारसायकल (केए २८, एचए १६३४) वरून अक्कलकोटकडे येत होते. त्याचवेळी अक्कलकोटकडून स्टेशनकडे जाणाऱ्या क्रूझर जीप (केए ४८, एम २५०८) चे समोरचे टायर फुटल्याने जीप मोटारसायकलवर आदळली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोघांचे डोके फुटून दोघे जागीच ठार झाले. दोघेही ऊसतोड मजुरीचे काम करत होते. या अपघाताची फिर्याद सिद्धाराम रमेश यारोळे (रा. अक्कलकोट स्टेशन) यांनी दिली.

फिर्यादी पेट्रोलपंपाजवळील शेतामध्ये कामाला असून अपघात झाल्यावर पाहायला गेले असता त्यांचेच नातेवाईक असल्याचे आढळल्याने लगेच ओळख पटली. पोलीस हवालदार रफीक शेख, कर्मचारी चंद्रजित बेळ्ळे यांना अपघाताची माहिती मिळताच तातडीने भेट देऊन कार्यवाही केली. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी अक्कलकोट ग्रामीण रूग्णालय येथे आणण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे करीत आहेत. ग्रामीण रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी करून आक्रोश केला.

Akkalkot: Mama-nephew killed when jeep collided with two-wheeler due to flat tire

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ कळंबोली येथे दिवसा घरफोडी, सव्वा लाखाचे दागिने पळविले

सोलापूर – कळंबोली (ता. माळशिरस) येथे भरदिवसा चोरट्याने बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून रोख रकमेसह १ लाख ३ हजाराचे दागिने पळविले. ही चोरी बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

कळंबोली येथे राहणारे आनंद दिलीप पाटील हे घाला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान दुपारच्या सुमारास चोरट्याने दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आणि कपाटातील रोख २० हजार रुपये आणि ते ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज घेऊन पसार झाला. या  चोरीची फिर्याद आनंद पाटील यांनी नातेपुते पोलिसात दाखल केली. हवालदार गायकवाड पुढील तपास करीत आहेत .

□ दुसरी बाई घरात आणून पत्नीस काठीने मारहाण

सोलापूर – दुसरी बाई घरात आणून ठेवल्याच्या भांडणातून पतीने काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत पत्नी जखमी झाली. ही घटना पानमंगरूळ (ता. अक्कलकोट) येथे घडली.

शिवलीला शिवलिंगप्पा कुडल (वय २२  रा.पानमंगरूळ) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. तिला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आज शुक्रवारी दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळच्या सुमारास शिवलिंगप्पा याने पत्नी शिवलीला हिला मारहाण केली. घरात दुसरी बाई आणून ठेवल्याच्या वादातून पतीने मारहाण केली अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

□ पैशाच्या वादातून आईच्या अंगावर रॉकेल ओतले

सोलापूर : विजापूर रोड वरील अत्तार नगरात पैसे मागण्याच्या भांडणातून मुलाने आईच्या अंगावर रॉकेल ओतले. ही घटना शुक्रवारी (ता. २५) दुपारच्या सुमारास घडली. शशिकला सुनील स्वामी (वय ५० रा. अतारनगर) असे अंगावर रॉकेल पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा ऋषिकेश स्वामी याने हा प्रकार केला. अशी नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे.

 

Tags: #Akkalkot #Mama #nephew #killed #jeep #collided #two-wheeler #flat #tire#अक्कलकोट #टायर #फुटून #जीप #दुचाकी #मामा #भाचे #ठार
Previous Post

देशमुखांनी डोक्यावर घेतला सपाटेंचा हात, पण सपाटे सरकले मागे

Next Post

सोलापुरातील सहा विद्यार्थी युध्दामुळे अडकले युक्रेनमध्ये

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरातील सहा विद्यार्थी युध्दामुळे अडकले युक्रेनमध्ये

सोलापुरातील सहा विद्यार्थी युध्दामुळे अडकले युक्रेनमध्ये

Comments 1

  1. Fake watchesbreitling 44 wayne gretzky replicafake rolex prank says:
    2 months ago

    11424 974855I like this website quite considerably so much outstanding data. 490376

वार्ता संग्रह

February 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28  
« Jan   Mar »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697