□ २१९ भारतीयांना घेऊन पहिले विमान रवाना
सोलापूर : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. त्यामुळे तेथे अडकून पडलेल्या व्यक्तीना मायदेशी परत आणण्याचे काम चालू आहे. यात सोलापुरातील सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातच आता हाती आलेल्या वृत्तानुसार २१९ भारतीयांना घेऊन पहिले विमान भारताकडे रवाना झाले आहे. यात या विद्यार्थ्यांचाही समावेश असू शकतो.
परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युध्द सुरु असल्याने व विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत. परिणामी तिकीट काढूनही त्यांना तेथेच राहावे लागल्याने कुटुंबातील सदस्यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, कुटुंबातील सदस्य परदेशात अडकलेल्या आपल्या मुलांना व्हॉट्सॲप कॉलिंग करून सातत्याने विचारपूस करीत आहेत. मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी या सहा मुलांची नावे जिल्हा प्रशासनाकडे कळविल्याची माहिती देण्यात आली.
प्रथमेश शिवाजी कांबळे (ब्रम्हपुरी), (मंगळवेढा), प्राजक्ता प्रथमेश माने (मंगळवेढा) हे तीन विद्यार्थी एम.बी.बी.एस.च्या प्रथम वर्षात तर रितेश गवळी (मंगळवेढा), सुप्रिया खटकाळे (मंगळवेढा), अभिजित चव्हाण (आंधळगाव) हे तिघे तिसऱ्या वर्षात शिकत आहेत.
युक्रेनपासून ६०० कि.मी. अंतरावर असलेल्या डेनिफ्रो येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. युध्द सुरु झाल्यानंतर संरक्षणासाठी ते आपल्या मायदेशी विमानाचे तिकीट काढून निघाले असतानाच विमान सेवा बंद झाल्याने त्यांना पुन्हा आपल्या कॉलेजच्या हॉस्टेलवर परतावे लागले. Six students from Solapur stranded in Ukraine due to war
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या परदेशात शिक्षण घेणाऱ्या सहा मुलांच्या पालकांनी पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आहे. आवताडे हे सध्या मुंबईमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून फडणवीस हे दिल्लीच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून त्या मुलांना सुरक्षितरीत्या महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे.
□ २१९ भारतीयांना घेऊन पहिले विमान रवाना
युक्रेनमध्ये तिसऱ्या दिवशीही बाँबहल्ले होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत. भारताने तातडीने नवीन एडवायजरी जाहीर केली आहे. यामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी अधिकाऱ्यांना न सांगता बॉर्डर किंवा पोस्टचौकीवर येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईवरून एअर इंडियाचे विशेष विमान रवाना करण्यात आले होते.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी वेगाने हालचाली केल्या जात असून भारतीयांना रोमानियातून एअर इंडियाच्या विमानाने आणलं जात आहे. सध्या २१९ भारतीय नागरिकांसह रोमानियाहून विमान मुंबईला रवाना झाले आहे अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. यात सोलापूरचे विद्यार्थी असण्याची शक्यता आहे.