मोहोळ – सहा चोरट्यांनी कारची वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकास बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत कंटेनरमधून तीन नवीन कार जबरदस्तीने उतरवून घेवून त्या पळवून नेल्या आहेत. चोरट्यांनी चोरुन नेलेल्या या तीन नव्या कारची किंमत ४३ लाख ४९ हजार आहे. ही घटना मोहोळ जवळील नजीक पिंपरी गावाजवळ घडली आहे.
या चोरीच्या घटनेमुळे मात्र मोहोळ कडून मंद्रूप कडे जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कंटेनरला चार चाकी गाडी आडवी लावून चालकाला मारहाण करीत कंटेनर मधील ४३ लाख ४९ हजार रुपयांच्या चारचाकी नवीन गाड्या अनोळखी चार चोरट्यांनी पळवल्या
नवीन चार चाकी गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनरला चार चाकी गाडी आडवी लावून चालकाला मारहाण करीत कंटेनर मधील ४३ लाख ४९ हजार रुपयांच्या चारचाकी नवीन गाड्या अनोळखी चार चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान मोहोळ – मंद्रूप महामार्गावरील नजीक पिंपरी गावच्या हद्दीत घडली. Mohol: Three new cars were stolen after beating the container driver
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, एम एच १२ एन एक्स ९८३४ या कंटेनर मधून चालक शिवम कुमार पांडे (वय-२८, रा. दामोदरपुर, ता. जि. बलिया) हे दोन पांढऱ्या रंगाच्या किया व एक काळ्या रंगाची किया अशा एकूण तीन कार या बेळ्यारी ते अहमदाबाद असे विजयपूर येथून घेऊन निघाला होता.
दुस-या दिवशी २५ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान मोहोळ ते मंद्रूप रस्त्यावर नजीक पिंपरी हद्दीमध्ये राजस्थानी ढाब्याजवळ सदरचा कंटेनर आला असता एक अज्ञात इंडिका कार त्या कंटेनर च्या समोर आडवी लावली. ऑइल बॉक्सला त्यांनी काहीतरी फेकून मारले. त्यामुळे चालकाने काहीतरी नुकसान झाले आहे का, म्हणून कंटेनर सावकाश रोडच्या खाली घेतली.
तेव्हा इंडिकाकारमधील चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाला पकडून मारहाण करीत त्या चार चोरट्यांनी गाडीचा पडदा वर करून पाहिला असता सदर कंटेनर मध्ये कार असलेले दिसल्या. तीन नवीन विना नोंदणी केलेल्या या कंपनीच्या तीन गाड्या धमकी देत मारहाण करून चोरून नेल्या.
याप्रकरणी चालक शिवम कुमार पांडे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला त्यांच्या मागावर पाठवले असून पोलीस उपनिरिक्षक संतोष माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद डावरे, पांडुरंग जगताप यांचे पथक हैदराबादकडे रवाना झाले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने हे करीत आहेत.