सोलापूर / नागपूर : युक्रेन रणभूमीत जिल्ह्यातील तब्बल 31 विद्यार्थी अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. विदर्भातील तब्बल 41 हून अधिक विद्यार्थी अडकल्याची माहिती आहे.
सोलापूर शहरातील पाच विद्यार्थी असून यात दोन मुले व तीन मुलींचा समावेश आहे. याशिवाय सांगोला तालुक्यातील दोन मुले व दोन मुली, पंढरपूर तालुक्यातील सहा मुले व तीन मुली, मोहोळ तालुक्यातील दोन मुले, मंगळवेढा तालुक्यातील चार मुले व एक मुलगी, बार्शी तालुक्यातील दोन मुले व एक मुलगी, माढा तालुक्यातील एक मुलगा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक मुलगी, करमाळा तालुक्यातील एक मुलगा असे एकूण 31 जण युक्रेन युद्धभूमीत अडकले आहेत.
या सर्वांची सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्य व केंद्र सरकारकडे संपर्क साधून पाठपुरावा करण्यात येत आहे. युध्दात अडकलेल्या नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोणीही नागरिक व विद्यार्थी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 31 students from the district stranded in Ukraine; All students of medical courses
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दिल्ली येथील मदत कक्षाच्या टोल फ्री क्रमांक 1800118797, दूरध्वनी क्रमांक 011-23012113/23014105/ 23017905 तसेच सोलापूर जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 0217- 2731012 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी युक्रेनला जाण्याचा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांचा प्रयत्न असून त्यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे परवानगी मागितली आहे.
□ विदर्भातील 41 विद्यार्थी अडकले
नागपूर जिल्ह्यातील पाच, भंडारा चार, बुलडाणा सहा आणि अमरावतीचे आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. गडचिरोली दोन, यवतमाळ सहा, चंद्रपूर सहा, वर्धा एक आणि गोंदियातील तीन विद्यार्थी अडकले असल्याची माहिती आहे. काल सायंकाळपर्यंत प्रशासनाकडे 41 विद्यार्थी अडकल्याची माहिती होती. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. नागपूर जिल्ह्यातील पाच पालकांनी संपर्क साधून विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती दिली. यामध्ये सेजल मिलिंद सोनटक्के, हिमांशु मोतीराम पवार, रविना प्रभाकर थाकीत, पीयूष मिलिंद गोमासे व तनुजा धर्मराज खंडाळे यांचा समावेश आहे. याची माहिती केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. विमला यांनी केले आहे.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्र. 0712-2562668
ई-मेल- rdc_nagpur@rediffmail.com
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली
हेल्पलाईन नंबर 1800118797 (टोल फ्री)
फोन – 011-23012113/23014105/23017905
Fax no.-011-23088124, Email ID:-situationroom@mea.gov.in
● सोशल मीडियावर चर्चा
हाच खरा हिरो… #ukrainerussia #UkraineCrisis
◇ सैन्यासोबत स्वत:च्या युद्धग्रस्त देशात फिरणारा, अमेरिकेकडून पळून जाण्याची ऑफर असताना नकार देणार, देशातील सैनिकांसोबतच मरेन असं सांगणारा अन् पळून जायला विमान काय पाठवताय युद्ध करतोय दारुगोळा पाठवा असं महासत्तेला खडसवून सांगणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की खरे हिरो ठरत आहेत. #war #UkraineConflict #surajyadigital #सुराज्यडिजिटल #ukraine #RussiaUkraine