वृत्तसंस्था : रशिया आणि युक्रेनमधील लढाई काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यातच आता रशियाने केलेल्या दाव्यानुसार चर्चेसाठी जो प्रस्ताव दिला होता, तो युक्रेनने स्वीकारलेला नाही. यामुळे आता युक्रेनवर यापेक्षा जोरदार हल्ले चढविले जाणार आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. सैन्याला युक्रेनवरील हल्ले आणखी वेगवान आणि आक्रमक करण्याचे आदेश देण्यात आले.
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. त्यामुळे या देशात मृत्यूतांडव सुरु झाले आहे. रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह, खार्किव्ह आणि खेरसन या शहरांवर हल्ला चढवला. अनेक इमारतींना लक्ष्य केले. यात आतापर्यंत युक्रेनच्या 198 जणांचा बळी केला आहे. यात काही सैनिक व तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. 1000 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. तर 1 लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेन सोडून दुसऱ्या देशात शरण घेतली आहे.
दरम्यान, युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये युक्रेनने पकडलेले रशियन सैनिक आहेत. रशियन सैनिकांच्या मातांनो, पत्नी आणि मुलींनो आपल्या या पुरुषांना घरी घेऊन जा, हे सैनिक आमचा देश नष्ट करण्यासाठी आणि निष्पाप लोकांना ठार करण्यासाठी परदेशी जमीनीवर आले आहेत,’ असे कुलेबा यांनी आवाहन केले आहे.
रशियाविरोधात आता युक्रेनच्या बाजूने जगातल्या इतर देशांनी एकजूट होताना पाहायला मिळत आहे. जगातील 28 देशांनी युक्रेन ला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेनं देखील रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची आणि फौजांची मदत करण्यास सुरुवात केली आहे.
युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिका तातडीने युक्रेनसाठी जेवलिन अँटी-टँक मिसाइल, अँटी-एयरक्राफ्ट सिस्टमसह 350 मिलियन डॉलर्सचे शस्त्रं पाठवत आहे. तर जर्मनीने हजार अँटी-टँक आणि 500 जमीनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाइल पाठवण्याची घोषणा केली आहे. नेदरलँड 50 अँटी-टँक आणि 400 रॉकेट युक्रेनला देणार आहे. फ्रान्सनेही मदत पाठवली आहे. नाटोने पूर्व युरोपमध्ये सैनिक तैनात करण्यास सुरुवात केली आहे. नेदरलँडने युक्रेनला 200 अँटि-एअर क्षेपणास्त्रे दिली आहेत. दुसरीकडे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘हे युद्ध आता दीर्घकाळ चालेल’, असा गंभीर इशारा दिला आहे.
Russia will attack from all sides, but many countries rushed to the aid of Ukraine
Spoke with 🇮🇳 Prime Minister @narendramodi. Informed of the course of 🇺🇦 repulsing 🇷🇺 aggression. More than 100,000 invaders are on our land. They insidiously fire on residential buildings. Urged 🇮🇳 to give us political support in🇺🇳 Security Council. Stop the aggressor together!
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) February 26, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अमेरिकेने युक्रेनला तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अमिरेकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांना युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी तात्काळ $350 दशलक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, जो बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या दुसर्या दिवशी युक्रेनमधील खासदार सोफिया फेडिना यांनी भारताकडून वैद्यकीय आणि राजनैतिक मदतीची मागणी केली.
झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय पाठिंब्याचे आवाहन केलं आहे. याबाबत व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. सुरक्षा परिषदेत त्यांना भारताचा पाठिंबा हवा आहे. त्यामुळे मोदी काय भूमिका घेतात याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. या आक्रमणामुळे युक्रेन उद्ध्वस्त झालं आहे. या परिस्थितीतून भारत देश एखादी कडक भूमिका घेत युक्रेन देशाला या दहशतीमधून बाहेर काढेल, अशी अपेक्षा व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना आहे. मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद साधला होता. मात्र रशिया भारताचा जुना मित्र आहे दुसरीकडे युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांनी भारताकडेच मदतीची मागणी केली आहे. भारताने आत्तापर्यंत तटस्थ भूमिक घेतली आहे.