औरंगाबाद : राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य ‘समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?’ असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये केलं. तसेच शिवाजी महाराजांना कमी लेखतोय असं नाही. पण ज्या माणसाला गुरु नाही, त्याची महती उरत नाही, असंही ते म्हणाले. राज्यपालांनी माफी मागावी अथवा बदनामीचा दावा दाखल करु, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध सोशल मीडियावर केला जातोय.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात बोलतांना राज्यपालांनी हे विधान केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर आता सोशल मीडियावर टीका टिपण्णी होत आहे.
आपल्या देशात गुरुची परंपरा आहे, गुरुचे महत्त्व मोठे आहे समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. समर्थ रामदासांमुळे सत्ता मिळाली असे शिवाजी महाराज म्हणाले. गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या देणार म्हणाले होते. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. राजा – महाराजा चक्रवर्ती सब, चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कोण पूछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कोण पूछेगा ? असे वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. Who would have asked Shivaji without Samarth ?, controversial statement of the Governor
छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या काळात रामदास नव्हते. मात्र काहींच्या हाती लेखणी होती. त्यांनी या कर्तृत्वसंपन्न महामानवाला घडवण्याचे काम रामदासांनी केले अशी कमाल लेखणीद्वारे केली आणि आपण मानू लागलो की महाराजांचे कर्तृत्व हे रामदासांमुळे आहे, पण हे खरं नव्हे. pic.twitter.com/cUO96QCmHd
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 15, 2020
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बहुतांश इतिहास अभ्यासक आणि इतिहासकारांच्या मते 1672 पूर्वी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या काळात, तसेच शिवाजी महाराज यांच्या बालपणी रामदासांनी मार्गदर्शन केले असावे याबाबत पुरावे सापडत नसल्याचं मत काही इतिहासकार व्यक्त करतात. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जानेवारी 2020 मध्ये रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलताना ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या काळात रामदास नव्हते’, असं वक्तव्य केलं होतं.
समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात’, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.
आपल्या देशात गुरूची परंपरा आहे ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो, समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरूचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. नोट आणि वोटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे, असे राज्यपाल म्हणाले.
संमेलनाचे आयोजन संत साहित्यशिक्षण व संशोधन प्रतिष्ठान, श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट,श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे, श्री समर्थ मंदिर संस्थान जांब, आदी संस्थांनी केले होते. pic.twitter.com/FS2DAa13Ia
— Governor of Maharashtra (@maha_governor) February 27, 2022
मोठा असलेला लहानावर हल्ला करतो हे बरोबर नाही, असे म्हणत भागतसिंह कोश्यारी यांनी रशिया आणि युक्रेनवर अप्रत्यक्ष विधान केले. मुकाबला बरोबरीच्या लोकांसोबत व्हावा, त्यावेळी त्यात दुराचार नसावा. रावण शक्तिशाली होता, त्याच्याकडे सत्ता, संपत्ती होती, तो विद्वान होता. देवांचे देव इंद्र देखील त्याच्या पुढे कोणी नव्हते. मात्र, त्याच्या मनात दुराचार आल्याने, रामा सारख्या साधारण व्यक्तीकडून तो पराभूत झाला, असे भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.