सोलापूर – विदेशी दारूची वाहतूक करताना ट्रकचा अपघात झाल्याचा देखावा करून ४९ लाखाची दारू परस्पर विकल्याप्रकरणी नाशिकच्या ड्रायव्हरसह चौघां विरुद्ध राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने नुकताच गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघांना अटक करून ४० लाखांची दारू अहमदनगर परिसरातून जप्त करण्यात आली. हा अपघात जातेगाव (ता.करमाळा) येथे शुक्रवारी झाल्याचा देखावा निर्माण करण्यात आला होता.
ट्रकचा ड्रायव्हर जाहीर रफिक अत्तार (वय ४९ रा.नाशिक), विष्णू मधुकर डमाळे (वय ४२ रा. कोळीवाडा,नाशिक) ट्रकचा मालक गुलाम मोहम्मद अन्सारी (रा.नाशिक) आणि दारू विकत घेणारा (दामू जाधव रा. घोडेगाव ता.नेवासा जि.अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली .
दिंडोरी (जि.नाशिक) येथील युनायटेड स्पिरिट येथून २३ फेबुवारी रोजी एमएच१५-बिजे-३७३३ या ट्रकमधून सोलापूर जिल्ह्यातील एका विक्रेत्याचे एक हजार पेट्या विदेशी दारू पाठविण्यात आली होती.त्या ट्रकचा २५ फेब्रुवारी रोजी जातेगाव हद्दीत अपघात झाला.या अपघातामध्ये विदेशी दारूचे मोठे नुकसान झाल्याचे कळवण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.अपघाताचा संशय आल्याने त्यांनी वाहन चालकाची चौकशी केली तेंव्हा त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता त्याने १ हजार बॉक्स पैकी ५९५ दारूचे बॉक्स संगनमताने अपघाताच्या आधीच घोडेगाव येथे पाठवून दिल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी ४० लाख ४७ हजार रुपये किमतीची ५२७ दारूचे बॉक्स घोडेगाव येथील दामू जाधव याच्या पत्राशेड मधून जप्त केले. 40 lakh worth of liquor was smuggled in an accident; Crime against four, arrest of two
ही कारवाई उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक मुळे, कदम, दुय्यम निरीक्षक अवताळे, शंकर पाटील, ए. एस.पाटील, शेख, भरते, कोळकर, मुंडे आदींनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
■ तिघा अल्पवयीन मुलाकडून ४३ चोरीच्या सायकली जप्त;वळसंग पोलिसांची कामगिरी
सोलापूर – शहर आणि ग्रामीण परिसरातून चोरीस गेलेल्या ४३ सायकली वळसंगच्या पोलिसांनी नुकतेच जप्त करून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.जप्त करण्यात आलेल्या सायकली २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गेल्या आठवड्यात कुंभारी घरकुल तालुका दक्षिण सोलापूर येथे राहणाऱ्या लक्ष्मी अंकम या महिलेची सायकल चोरीस गेली होती. त्यांनी यासंदर्भात वळसंग पोलिसात तक्रार दाखल केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांनी संशयावरून विडी घरकुल परिसरातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने घरकुल कुंभारी परिसरातील आणखी दोघा अल्पवयीन मुलांना घेऊन सोलापूर शहर आणि परिसरातून अनेक सायकली चोरल्याची कबुली दिली. पोलीसांनी याच्या दोघां साथीदारांना ताब्यात एकूण ४३ सायकली जप्त केले. 43 stolen bicycles seized from three minors;
चोरीस गेलेल्या सायकली कोणाचे असतील त्यांनी वळसंग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले. सहाय्यक निरीक्षक भोसले, फौजदार हंचाटे, हवालदार सय्यद, अभिजीत रावडे, बाबुराव करपे, मिलिंद पवार, विक्रम माने, नरेंद्र गायकवाड आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.