● पोलिस अधीक्षक अमोल भारती यांची माहिती
मोहोळ : नवीन किया कंपनीच्या कार गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनरला इंडीका कार आडवी लावून चालकाला मारहाण करित तीन गाड्या पळवून नेल्या होत्या , त्या गाड्या व तीन जणांना तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, एम एच १२ एन एक्स ९८३४ या कंटेनरमधून चालक शिवम कुमार पांडे (वय-२८, रा. दामोदरपूर, ता. जि. बलिया) हे दोन पांढऱ्या रंगाच्या किया व एक काळ्या रंगाची किया अशा एकूण तीन कार या बेळ्यारी ते अहमदाबाद असे २४ फेब्रुवारी रोजी विजयपूर येथून घेऊन निघाला होता. दि. २५ रोजी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान मोहोळ ते मंद्रूप रस्त्यावर नजीक पिंपरी हद्दीमध्ये राजस्थानी ढाब्याजवळ सदरचा कंटेनर आला.
याचवेळी अज्ञात इंडिका कार त्या कंटेनरच्या समोर आडवी लावली तसेच ऑइल बॉक्सला त्यांनी काहीतरी फेकून मारले. त्यामुळे चालकाने काहीतरी नुकसान झाले आहे का, म्हणून कंटेनर सावकाश रोडच्या खाली घेतला असता इंडिका कारमधील चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाला पकडून मारहाण केली. त्या चार चोरट्यांनी गाडीचा पडदा वर करून पाहिला असता सदर कंटेनरमध्ये कार असलेले दिसले. Three arrested from Telangana for hijacking three vehicles
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यातील तीन नवीन विना नोंदणी केलेल्या या कंपनीच्या तीन गाड्या धमकी देत मारहाण करून चोरून नेल्या.
याप्रकरणी चालक शिवम कुमार पांडे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला त्यांच्या मागावर पाठवले होते. पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद डावरे, पांडुरंग जगताप यांचे पथक हैदराबाद कडे रवाना झाले होते.
या तीन पैकी दोन गाड्यांना GPS सिस्टीम होती. त्यामुळे या गाड्या तेलंगणामध्ये नेमक्या कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत हे लक्षात आले. त्यानुसार तेथील पोलिसांशी संपर्क साधून या गाड्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तोपर्यंत मोहोळ पोलिस त्या ठिकणी पोचले एक चोरटा व दोन जण गाड्या विकत घेवून कमीशनवर पुढे विकणारे असे तिघांना ताब्यात घेण्यात आले.
नियाज रशीद मोहमद (वय ३०) हरियाना शोयब महंमद सय्यद (रा हुबळी कर्नाटक) शेखर गोडा दुडडन गौडा हळी (रा बेल्लाळी कर्नाटक) यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील आरोपीचा तपास सुरु असल्याचे अमोल भारती यांनी सांगितले.
I’ve been surfing on-line more than three hours as of late, but I by no means discovered any interesting article like yours. It is beautiful price enough for me. Personally, if all site owners and bloggers made good content material as you probably did, the web shall be much more helpful than ever before. “I finally realized that being grateful to my body was key to giving more love to myself.” by Oprah Winfrey.
Would you be desirous about exchanging hyperlinks?
This is very interesting, You are an overly skilled blogger. I’ve joined your feed and look ahead to in quest of extra of your wonderful post. Additionally, I’ve shared your site in my social networks!