● छत्रपतींबाबत राज्यपालांच्या वक्तव्याचे मात्र केले समर्थन
● एसटी कर्मचारी संपाकडे दुर्लक्ष
सोलापूर – शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणारे मुख्यमंत्री अटक झालेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीत. कारण सत्तेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हतबल झाल्याचा मार्मिक टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावत ठाकरेबाणा कुठे गेला असा प्रश्न विचारला आहे.
आज सोलापूर दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशद्रोहाचे आरोप असणाऱ्या नवाब मलीक यांचा राजिनामा घेण्यास धजावत नाहीत कारण त्यांना आपली खुर्ची जाईल याची भीती आहे, असा आरोप केला. ते म्हणाले, ज्या पध्दतीनं संजय राठोड यांचा राजिनामा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेवून तत्काळ घेतला ती तत्परता ते राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या बाबतीत घेवू शकत नाहीत, कारण त्यांना मित्र पक्षांची नाराजी नको आहे यातून आपली खुर्ची जाईल याची भीतीही आहेच. राष्ट्रद्रोह्यांशी संबंध ठेवणाऱ्या मलिकांना देशभक्त करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेते करत आहेत, असा आरोपही दरेकर न्यांनी केला.
अत्तापर्यंतच्या ईडी तपासात मलिकांविरोधात अनेक बाबी पुढे आल्या आहेत. तरीही त्यांना संरक्षण देण्याचं काम ठाकरे आणि इतर नेते मंडळी करत आहेत ही बाब गंभीर आहे. भाजपाचे कोणी नेते अवैध संपत्ती गोळा करत असतील तर नुसते इशारे काय देता पुराव्यासह तक्रारी दाखल करा त्यासाठी भाजपा नेतृत्वाच्या परवानगीची गरज नाही. या संस्था स्वायत असून त्या निश्चित कारवा करतील असंही दरेकर म्हणाले.
मलिक यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करताना दरेकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या ज्या नेत्यांवर ईडीसह इतर शासकीय यंत्रणांकडून कारवाई झालेली आहे. त्याबाबत भाजपची तक्रार नव्हती. टेरर फंडींग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांना देशभक्त दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करीत आहे. Attempt to patriotize Malikis who have links with traitors – darekar
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
३५७ निष्पांपाचा बळी घेणारा बॉम्बस्फोट घडविणाऱ्या आरोपींशी व्यवहार करणे म्हणजे मोठा देशद्रोह असून मलिकांना तो केला आहे. हे सरकार याला मुस्लिम रंग देण्याचाही प्रयत्न करीत आहे. शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करायला वेळ नसलेल्या ठाकरे सरकारला देशद्रोही मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनास वेळ आहे. एसटी कर्मचारी संप इतके महिने सुरु असतानाही हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही दरेकर म्हणाले.
राष्ट्रवादीचे मंत्री मलिक सध्या जेलमध्ये असल्याने ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला कसे हजर राहणार. अगोदरच मातोश्रीवर एक स्क्रीन लावला आहे आता दुसरा स्क्रीन मलिकांसाठी जेमध्ये लावावा लागेल, असेही दरेकर म्हणाले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे पूर्ण भ्रष्टाचारी असल्याचे भाजपने जाहीर केले आहे तर मग भविष्यात या भ्रष्टाचारी पक्षांसोबत युती करणार का, या प्रश्नावर मात्र दरेकर यांनी सावध पवित्रा घेतला. मला वाटते अशा भ्रष्टाचारी पक्षाशी युती करू नये. पण पुढे काय होणार हे आता कसे सांगू असेही ते म्हणाले.
□ मलिक हटाव, देश राज्य बचाव
दरेकर म्हणाले, “भाजपने संपूर्ण राज्यभर देशभक्तीच्या उद्देशाने एक अभियान सुरू केलं आहे, ‘नवाब मलिक हटाव, देश बचाव.’ नवाब मलिकांवर सूड भावनेनं कारवाई केली जात असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न होतोय. राज्यभर वस्तुस्थिती मांडली जाणार आहे.”
देशात आणि राज्यात भाजपा सुडबुध्दीने वागत असून जाणीवपूर्वक कारवाया करीत असल्याचा आव महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी आणला आहे. मात्र, ही गोष्ट साफ खोटी असून राज्यात काम करणार्या तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करित असून त्यांना निदर्शनास आलेल्या लोकांवर कारवाया आणि चौकशी करिता आहे. मात्र, केवळ आपले पाप झाकण्यासाठी महाविकास आघाडी भाजपावर आरोप करीत आहे. हेच राज्यातील लोकांना समजून सांगण्यासाठी मंत्री नवाब मलिक हटाव आणि देश राज्य बचाव असा नारा आता भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रविण दरेकरांनी सोलापुरात प्रेस घेतली.
□ छत्रपतींबाबत राज्यपालांच्या वक्तव्याचे मात्र केले समर्थन
छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून सध्या राज्यात गोंधळ सुरु असल्याबाबत दरेकर म्हणाले, राज्यपालांचे वक्तव्य तसे नव्हते त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे सांगत दरेकरांनी त्यांचे समर्थन केले.
छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल यांचे मात्र दरेकर यांनी समर्थन केले आहे.