नवी दिल्ली : युक्रेनच्या खारकीवमध्ये गोळीबारात मृत्यूमुखी पडलेला भारतीय विद्यार्थी कर्नाटकचा होता. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरी जिल्ह्यातील नवीन शेखरप्पा यांच्या वडिलांशी संवाद साधला. नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असं बोम्मई यांनी म्हटलं आहे. नवीन शेखरप्पा चलागेरीचे रहिवासी होते.
२१ वर्षीय या विद्यार्थ्याचे नाव नवीन शेखरप्पा असून तो कर्नाटकातील हावेरीतील चळगेरीमध्ये राहणारा होता. नवीनच्या मृत्यूची माहिती स्वतः भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या गोळीबारात जवळपास अकरा लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवीनच्या कुटुंबियांसोबत फोनवरून संपर्क साधला असून दुःख व्यक्त केले आहे. शिवाय नवीनच्या मृतदेह आणण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल, असे आश्वासन बोम्मई यांनी नवीनच्या कुटुंबियांना दिले आहे. Ukraine, Karnataka, Indian student killed in shooting
I am saddened beyond words to learn that #Naveen Kumar – a 4th year MBBS student from Ranibennur, #Karnataka lost his life in Kharkiv #Ukraine this morning.
Naveen’s death has shattered the entire Nation.
May God give the family strength to bear the irreparable loss. Om Shanti. pic.twitter.com/81cJJSFTww
— P C Mohan (Modi Ka Parivar) (@PCMohanMP) March 1, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भाजपचे खासदार पीसी मोहन ट्वीट करून म्हणाले की, ‘कर्नाटकातील नवीनचा आज सकाळी खारकिवमध्ये मृत्यू झाल्याचे ऐकून दुःख झाले आहे. तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थी होता. नवीन यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्याची देव त्याच्या कुटुंबाला शक्ती देवो.’
नवीन हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता. खारकीव शहरातल्या बंकरमध्ये नवीनने आश्रय घेतला होता. पण जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तो बंकरमधून बाहेर पडला होता. नवीनने दोन दिवसांपूर्वी मोबाईलवरून कुटुंबियांशी संवाद साधला होता. पण युक्रेनमधील बॉम्बहल्ल्यात नवीनच्या दुर्दैवी मृत्यूमुळे चळगेरीमध्ये शोककळा पसरली आहे.
भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्याचा निर्णयही मोदी सरकारने घेतला आहे. ही जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रिजिजू, व्हीके सिंग आणि हरदीप सिंग पुरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये ६ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनमध्ये पहिला हल्ला केला होता.
मुंबई विमानतळावर आज सकाळी सात वाजता एअर इंडिया एक्सप्रेसचे विशेष विमान दाखल झाले. या विमानाने हेन्री कोनाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुकारेस्टवरुन काल रात्री मुंबईसाठी उड्डाण केले होते. ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणणारे हे सातवे विमान होते. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाईसजेट या विमान कंपन्या ऑपरेशन गंगा मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमधून दिल्ली आणि मुंबईकडे आणण्यात येत आहे.