सोलापूर – हैदराबाद रोड वरील मंत्री चंडक आंगण येथे राहणाऱ्या हॉटेल चालक आणि एका व्यापाऱ्याच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह १६ लाख ४६ हजाराचे दागिने पळविले. या धाडसी घाफोड्या आज पहाटे उघडकीस आल्या .या प्रकारामुळे सोलापूर शहरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी पोलीस आयुक्त हरीश बैजल आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
हैदराबाद रोड वरील मंत्री चांडक आंगन येथे अफसर शफी खान या हॉटेल व्यावसायिकांचा बंगला आहे. ते रविवारी (ता. २७) आपल्या कुटुंबीयांसह पुणे येथे मावशीच्या मुलीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर ते मंगळवारी (ता. १) पहाटे मोटारीतून घरी परतले. तेव्हा त्यांच्या बंगल्याच्या गेटचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहणी केली असता सर्व खोल्यातील कपाटाचे लॉकर उचकटल्याचे आढळले.
पाहणी केली असता त्यांच्या घरातून २८५ ग्राम सोन्याचे दागिने गायब झाल्याचे दिसून आले. या घटनेची फिर्याद खान यांनी एमआयडीसी पोलिसात दाखल केली. चोरीस गेलेल्या दागिन्याची किंमत ८ लाख ५५ हजार इतकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दुसरी चोरीची घटना त्याच परिसरातील त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या जुनेद तिम्मतवाला या व्यापाऱ्याच्या घरात पडली ते देखील शुक्रवारी बंगल्याला कुलूप लावून औरंगाबाद येथे गेले होते. आज सकाळी परतल्यानंतर त्यांच्या ही बंगल्यात तसाच प्रकार दिसून आला. या घटनेची तक्रार त्यांनी एमआयडीसी पोलिसात दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. Solapur: Hotelier, burglar steals Rs 16 lakh
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
श्वानपथक आणि फिंगर प्रिंट द्वारे चोरट्यांचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जुनेद यांच्या बंगल्यातून कितीचा ऐवज गेला हे समजले नव्हते. रोख रकमेसह दागिने मोठ्या प्रमाणात गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद देखील एमआयडीसी पोलिसात झाली. पोलीस निरीक्षक बोंदर पुढील तपास करीत आहेत.
□ कुरुल येथे शेतीच्या वादातून दोन गटात चाकू आणि दगडाने मारहाण दोघे जखमी
सोलापूर – शेत जमिनीच्या वादातून दोन गटात सत्तूर, चाकू काठी आणि दगडाने केलेल्या मारहाणीतदोघे जण जखमी झाले ही घटना आज मंगळवारी सकाळी कुरूल तालुका मोहोळ येथे घडली.जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भाऊसाहेब मुरलीधर जाधव (वय ४५ रा. कुरुल) असे जखमीचे नाव आहे. त्यांना दयानंद कोळेकर, आप्पासाहेब वाघमोडे, दत्ता घोडके आणि त्यांच्या साथीदारांनी सतुर, चाकू आणि काठीने मारहाण केली. तर दुसर्या गटातील दयानंद बळीराम कोळेकर (वय ३३ रा. कुरुल) याला त्याच कारणावरून भाऊसाहेब जाधव आणि गणेश जाधव यांनी दगडाने मारहाण केली अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.