पुणे : पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक घटना घडली. 23 वर्षीय विवाहितेला सासरच्या कुटुंबानं फरसी पुसण्याचं ॲसिड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिरदोस रेहान काझी असं फिर्यादी महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पती, सासू, नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॅटसाठी पैसे आणत नसल्याने सासूने नणंदेच्या मदतीनं पीडितेला फरशी पुसण्याचं ॲसिड पाजलं.
हा अॅसिड पाजण्याचा प्रयत्न 12 फेब्रुवारी रोजी झाला आहे. पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडित तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती रेहान काझी, सासू नजमा काझी , नणंद गजाला काझी आणि हीना खान यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. पीडित महिला आणि आरोपी रेहान यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. Shocking event; The father-in-law gave acid to the married woman for money
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
लग्नानंतर फिरदोस आपल्या पतीसह हांडेवाडी परिसरात राहायला आली होती. याठिकाणी पती रेहानने एक फ्लॅट विकत घेतला होता. मात्र या फ्लॅटसाठी पत्नी फिरदोसने आपल्या माहेरून दोन लाख रुपये घेऊन यावेत, असे रेहानला वाटत होते.
रेहानने आपल्या पत्नीकडे पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी तो पत्नी फिरदोसला सतत टोचून बोलणं, शिवीगाळ करणं अशाप्रकारे मानसिक त्रास देत होता. यानंतर याच कारणावरून सासू नजमा काझी, नणंद गजाला काझी आणि हीना खान यांनी पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर घटनेच्या दिवशी सासूने सतत सांगूनही पैसे आणत नसल्याच्या कारणातून पीडित फिरदोसला नणंदेंच्या मदतीने फरशी पुसण्याचं अॅसिड पाजले. यानंतर फिरदोसची प्रकृती खालावली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर कोंढवा पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.