नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला दणका दिला आहे. रशियाच्या विमानांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. रशियासाठी अमेरिकेने हवाई क्षेत्र बंद केले आहे. तसेच या युद्धात आम्ही युक्रेनच्या सोबत आहोत, अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे रशिया कमकुवत होणार, त्यांची आर्थिक व्यवस्था नष्ट होणार, ‘ असेही बायडेन म्हणाले. युक्रेनसाठी त्यांनी 1 बिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत अमेरिकन संसदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (jo biden) गोंधळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा हा व्हिडियो मोठया प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्या या गोंधळाची नेटिझन्सकडून खिल्ली उडवली जात आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्या गेल्या सहा दिवसांपासून घमासान सुरू आहे. या सर्व घडामोडींवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भाष्य करत होते त्यावेळी बायडेन यांनी ‘युक्रेनियन नागरिक’ ऐवजी इराणी नागरिक असा शब्द प्रयोग केला. त्यांच्या या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, ट्विटरवर ‘इरानीयन’ शब्द ट्रेंड होऊ लागला आहे. The blow to Russia, finally the big announcement of the US, Biden confused while speaking in Parliament
LMFAO Kamala appears to mouth “Ukrainian” when Joe Biden said Iranian.
pic.twitter.com/E28NEmiPOv— Greg Price (@greg_price11) March 2, 2022
जो बायडेन यांचा असा चुकीचा शब्द प्रयोग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी म्हणजेच गेल्या वर्षी त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष म्हणण्याऐवजी अध्यक्ष हॅरिस असे संबोधले होते. तर संसदेत भाषणादरम्यान रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना हुकूमशहा म्हटले होते.
किवला लष्कराच्या टँकरने पुतिन घेरण्याचा विचार करत आहेत. मात्र, इराणी लोकांचे मन कधीच जिंकू शकणार नाही.’ असे विधान केले. बायडेन यांना युक्रेनियन असे म्हणायचे होते मात्र, चुकून त्यांच्याकडून युक्रेनियन ऐवजी इराणी असा शब्द प्रयोग करण्यात आला. भाषणाच्या या व्हिडिओमद्ये उपराष्ट्रपती कमला हॅरिसही दिसत असून त्या बायडेन यांच्या मागे उभ्या असल्याचे दिसत आहे. बायडेन यांच्या चुकिच्या शब्द प्रयोगानंतर हॅरिस यांनी त्वरित प्रसंगावधान दाखवत मागून युक्रेनियन असे सांगत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
दोन्ही देशात युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका युक्रेनच्या बाजुने उभी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेतील अमेरिकेच्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ला संबोधित करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यावर चांगलाचा हल्लाबोल केला आहे.
“अमेरिका युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नाही, परंतु, युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याला मनमानी करू देणार नाही,” असे स्पष्ट संकेत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुतीनला दिले आहे. आणि रशिया-युक्रेनच्या युद्धात अमेरिकी सैन्य पाठवण्याच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.
जो बायडन म्हणाले, “रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाची पुतीनला किंमत चुकावी लागेल. रशियावर आम्ही आर्थिक निर्बंध लादणार आहोत. फक्त अमेरिकाच नव्हेत कर युरोपियन संघातील 27 राष्ट्र देखील युक्रेनसोबत या युद्धात त्यांच्या पाठिशी उभे आहेत. अमेरिकेने रशियाची हवाई हद्द बंद केली असल्याची घोषणा यावेळी केली. पुतीन हे हुकूमशहा आहे. त्यामुळे रशियाविरोद्ध युक्रेन अशी लढाई नसून हुकूमशहा विरुद्ध स्वातंत्र्य आहे. युक्रेनच्या जमीनीच्या एका-एक इंचाचे अमेरिका आणि नाटो देश रक्षण करणार आहेत, असे ते म्हणाले