मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांची मुस्कटदाबी करून राज्यसरकारने लोकशाही पायदळी तुडवली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. तसेच यावेळी फडणवीसांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरली नसल्याचं फडणवीसांनी टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला इशारा दिला आहे. मुंबईच्या खून्याशी व्यवहार खपवून घेणार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे. उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनात ही चर्चा झाली पाहिजे, ही सरकारी पक्षाची भूमिका राहिली पाहिजे. सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून ठाकरे सरकारची ओळख निर्माण झालीय, असे फडणवीस म्हणाले.
भाजप आणि मित्र पक्षांची अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक झाली. अधिवेशनात कोणते विषय मांडायचे याची चर्चा आम्ही केली आहे. महाराष्ट्रात जी परिस्थिती समोर येते आहे त्यावरही प्रामुख्याने विचार झाला. देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते महाराष्ट्रात पाहायला मिळतं आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होतंय, त्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकारच्या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनात ही चर्चा झाली पाहिजे, ही सरकारी पक्षाची भूमिका राहिली पाहिजे, असंही ते म्हणाले. Ajit Pawar’s words have no value in government- Devendra Fadnavis; Protesters boycott tea
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट...
नवाब मलिकांवर बोलताना दाऊदला सहकार्य केले तरी ठाकरे सरकार पाठिशीच आहे. तसेच उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असून महत्वांच्या मुद्दयांवर चर्चा झाली नाही, तर आम्हाला विचार करावा लागेल असा ठाकरे सरकारला गर्भित इशारा फडणवीसांनी केला आहे. आज अधिवेशनाच्या पूर्व संध्येला बैठक झाली, देशाच्या इतिहासात जे घडले नाही ते बघायला मिळत आहे. दाऊदशी व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक याना वाचण्यासाठी अख्ख सरकार उभ राहिलं आहे. राज्य घटनेचा अवमान हे सरकार करत आहे.
□ सतरा-अठरा दिवस चालणारं अधिवेशन, चर्चा करणार
भाजप नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सभागृहात संघर्ष करेल. या शिवाय अनेक महत्वाचे मुद्दे या अधिवेशनात मांडले जाणार आहेत. आम्हाला चर्चा करण्यामध्ये रस आहे. अनेक दिवसांनंतर सतरा-अठरा दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळालं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न तिथे मांडले गेले पाहिजेत हीच आमचीही भूमिका आहे. मात्र सरकारी पक्षाचीही ही जबाबदारी आहे की चर्चा झाली पाहिजे. अन्यथा ओबीसींच्या प्रश्नांवर बोललं तर बारा लोकांना निलंबित केलं. विद्यापीठाचं विधेयक विरोधकांची मुस्कटदाबी करून काढलं गेलं. या अधिवेशनातही सरकार असंच वागणार असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल. अन्यथा आम्ही लोकशाही मानणारे आहोत असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.