Tuesday, May 24, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पुण्यात सेप्टिक टँक साफ करताना चार मजुरांचा मृत्यू, एक मजूर सोलापूरचा

Surajya Digital by Surajya Digital
March 2, 2022
in Hot News, महाराष्ट्र, सोलापूर
2
पुण्यात सेप्टिक टँक साफ करताना चार मजुरांचा मृत्यू, एक मजूर सोलापूरचा
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एका इमारतीतील सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. यातील एक मजूर सोलापुरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी अकरा वाजता घडली आहे. दोघांना वाचवताना चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही सोसायटी पुणे शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी काही लोक कदमवाक वस्तीच्या मागे असलेल्या रहिवासी संकुलातील सेप्टिक टँकची साफसफाई करत होते. टाकीतील विषारी वायूमुळे चौघांचा मृत्यू झाला आहे.

सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे (वय -४५, रा.पाण्याची टाकी संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली), पद्माकर मारुती वाघमारे (वय-४३, पठारे वस्ती), कृष्णा दत्ता जाधव (वय- २६ रा. देशमुख वस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर, सोलापूर), रुपेश उर्फ सुवर्ण कांबळे, (वय- ४५ घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनेबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी अधिक तपास करीत आहेत.

Four laborers killed while cleaning septic tank in Pune, one laborer from Solapur

Maharashtra | Four people died due to suffocation while cleaning a septic tank in a private residence in Loni Kalbhor village of Pune. Fire Brigade is present at the spot. Details awaited.

— ANI (@ANI) March 2, 2022

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

आज बुधवारी सकाळी टाकीची स्वच्छता करत असताना चौघांपैकी कृष्णा जाधव शौचालयाच्या टाकीत पाईप सरकवत असताना तोल जाऊन पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दादा कसबे देखील टाकीत पडले. या दोघांना वाचण्यासाठी सुवर्ण कांबळे हे टाकीत उतरले.

दोघांचा जीव वाचवताना चौघांचा मृत्यू लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम दोन जण टाकीची साफसफाई करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्याचा गुदमरल्यावर आणखी दोन जण त्याला वाचवण्यासाठी टाकीत घुसले. मात्र, गुदमरल्याने चौघांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन जण हे सेप्टिक टँकच्या साफसफाईचे काम करत होते तर दोन जण या सोसायटीतील दैनंदिन काम पाहत होते.

□ आतापर्यंत 600 हून अधिक मृत्यू

आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांत गटार आणि सेप्टिक टाक्यांच्या साफसफाईदरम्यान 600 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2010 ते मार्च 2020 या कालावधीत गटार आणि सेप्टिक टाक्यांची साफसफाई करताना झालेल्या मृत्यूंबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगाने माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती दिली आहे.

या दरम्यान 631 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 2019 मध्ये सर्वाधिक 115 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षात सर्वाधिक 122 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर उत्तर प्रदेशात ८५, दिल्ली आणि कर्नाटकात ६३, गुजरातमध्ये ६१ आणि हरियाणामध्ये ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags: #laborers #killed #cleaning #septictank #Pune #laborer #Solapur#पुणे #सेप्टिकटँक #साफ #चार #मजुरांचा #मृत्यू #मजूर #सोलापूरचा
Previous Post

सरकारमध्ये अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरली नाही- देवेंद्र फडणवीस; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Next Post

नवाब मलिकांना दिलासा नाहीच, अजितदादांची सावध प्रतिक्रिया

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
नवाब मलिकांना दिलासा नाहीच, अजितदादांची सावध प्रतिक्रिया

नवाब मलिकांना दिलासा नाहीच, अजितदादांची सावध प्रतिक्रिया

Comments 2

  1. Benito Roofe says:
    3 months ago

    I regard something truly special in this website .

  2. חכירה מחיר השכרת גנרטורים says:
    2 months ago

    I conceive this internet site holds some very great information for everyone. “To be able to be caught up into the world of thought — that is being educated.” by Edith Hamilton.

वार्ता संग्रह

March 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Feb   Apr »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697