मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पण झालेली अटक ही बेकायदा असल्याचं सांगत याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यावर आज सुनावणी पार पडली. पण मलिकांना दिलासा मिळाला नाही. या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 7 मार्च रोजी यावर पुढील सुनावणी होईल.
नवाब मलिकांनी ईडीच्या कारवाईविरोधात तूर्तास कोणताही तातडीचा दिलासा हायकोर्टानं दिलेला नाही. आजच्या सुनावणीत नवाब मलिकांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीनं आठवड्याभराचा वेळ मागितला होता. मात्र या प्रकरणाची गंभीरता पाहात हायकोर्टानं तपासयंत्रणेला तातडीनं आपलं उत्तर देण्याचे निर्देश देत नवाब मलिकांच्या याचिकेवर हायकोर्टात सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
आज बुधवारच्या सुनावणीत नवाब मलिकांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीनं आठवड्याभराचा वेळ मागितला होता. मात्र या प्रकरणाची गंभीरता पाहात हायकोर्टानं तपासयंत्रणेला तातडीनं आपलं उत्तर देण्याचे निर्देश देत नवाब मलिकांच्या याचिकेवर हायकोर्टात सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. No consolation to Nawab Malik, Ajit Pawar’s cautious reaction
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दरम्यान गुरूवारी नवाब मलिकांची पहिली रिमांड संपत असल्यानं त्याबाबत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं काहीही निकाल दिला तरी त्याचा या याचिकेवर परिणाम होणार नाही. दोन्ही बाजूंसाठी दाद मागण्याचा पर्याय खुला राहील असं न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती गोविंदा सानप यांच्या खंडपीठानं आपल्या आदेशांत नमूद केलं आहे.
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप लावून धरणार आहे. यावर अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारणार नाही यावर ठाम आहेत. मात्र सभागृहात काय निर्णय घ्यायचा हे सभागृहात ठरेल. कोणाचा राजीनामा स्वीकारायचा हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.
राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकार चालवत असताना जे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत त्यासाठी दोन पावले पुढे मागे होतात. मात्र ज्या मुद्यावर सरकार ठाम आहे, त्यावर मागे यायचे कारण नाही, असं अजित पवार म्हणाले.