● राज्यपाल कोश्यारींनी प्रतिक्रिया देणे टाळले
सोलापूर : स्वामी विवेकानंद केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त आज शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या दौऱ्याला शिवप्रेमींनी प्रखर विरोध केला आहे.
राज्यपाल कोश्यारी याचं शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता विमानतळावर आगमन झाले. महापौर श्रीकांचना यन्नम व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
दो-यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांसह एक हजार ६२ पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यात ड्रोनची हायटेक पद्धत वापरून परिस्थितीवर लक्ष ठेवले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास या विषयावर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. राज्यपालांचा विरोध करत सर्वपक्षीय शिवप्रेमी सोलापुरातील आसरा चौक येथे जमले.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले की, कोश्यारी रायगडावर जावून छत्रपती शिवरायांची माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे, असे सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक विनोद भोसले, गुरुशांत धुत्तरगावकर, संभाजी आरमारचे श्रीकांत घाडगे, शिवाजी वाघमोडे आदीसह संभाजी ब्रिगेडचे शाम कदम, अरविंद शेळके, अनिकेत कदम, विकास डोलारे, नवनाथ देडे, प्रशांत एकाड , अनिकेत कवाडे शिवप्रेमी उपस्थित होते.
संतप्त कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला असून त्यांना काळे झेंडे दाखवले आहे. पण पोलिसांनी कडक बंदोबस्त लावत सर्व आंदोलकांना रोखून ठेवले. पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेतले.
राज्यपालांच्या दौऱ्यावेळी काही जणांनी काळे झेंडे दाखवले. विमानतळ, आसरा चौक, विवेकानंद केंद्र या भागामध्ये पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने शिवप्रेमींनी राज्यपालांच्या निषेधाची भूमिका घेतली आहे. या दरम्यान निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापुरात कोश्यारींना कडाडून विरोध, माफी मागितल्याशिवाय माघार नाही.
In Solapur, there is no turning back unless Koshyari strongly opposes and apologizes
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राज्यपाल जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोकांनी जुळे मार्गावर घेतला. मात्र हा विरोध राज्यपालांना नसून संघनिष्ठ, बेताल वक्तव्य करणा-या भगतसिंग कोश्यारींना असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लीकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे शुक्रवारी सकाळी सोलापूरला आले. जुळे सोलापुरातील प्रणव नगरी बॉम्बे पार्क येथे कार्यक्रम पार पडला.
विमानतळापासून कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत पोलिसांचा चौक बंदोबस्त लावला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपालांच्या दौऱ्याला शिवप्रेमींनी विरोध केला. राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापुरातील शिवप्रेमींना रोखण्यासाठी काही मार्ग वाहतुकीस बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांना माणसांना सोसावा लागत आहे. विमानतळाबाहेर पंधरा ते वीस हजार शिवप्रेमी जमणार असल्याचा दावा शिवप्रेमींनी केला जात आहे. यावेळी ग्रामीण भागात देखील रस्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे. कार्यक्रमानंतर विरोधाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले.
विरोध, निदर्शनासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
बंदोबस्तामध्ये पोलीस आयुक्त हरीश बैजल, तीन पोलीस उपायुक्त, चार पोलीस सहाय्यक पोलिस आयुक्त, १८ पोलीस निरीक्षक, ३० साहाय्यक पोलीस निरीक्षक, ४८ पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी होते. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी यांचाही समावेश होता.