● वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी
सोलापूर / पंढरपूर : वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी ठरला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी (ता. पंढरपूर) येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली. उपचारादरम्यान आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सूरजला पंढरपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मगरवाडी येथे सूरज जाधव याची शेती आहे. मात्र, शेतीत म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. शेती करत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सूरज हताश झाला होता. त्यातूनच टोकाचे पाऊल उचलत ‘शेतकऱ्यांच्या पोटी आपण परत कधीच जन्माला येणार नाही, शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करू शकत नाही, गेम इज द ओवर’ असे म्हणत सूरजने विषाचा कडवा घोट घेतला आहे.
सध्या ग्रामीण भागात शेतीपंपाची वीजतोडणी मोहिम वेगात सुरू आहे. या वीजतोडणीमुळे शेतातील उभी पिके जळून जात आहेत. या वीज तोडणी व महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने मरणापूर्वी व्हिडिओ करून आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी गेला आहे. आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरण वर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही, असे म्हणून पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली. Shocking; Young farmer commits suicide in Pandharpur saying game is the over
धक्कादायक
वीज तोडणी चा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरण वर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी तालुका पंढरपूर येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली pic.twitter.com/59VBs3hLkJ— Surajya Digital (@SurajyaDigital) March 4, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सूरजच्या मृत्यूनंतर स्थानिक भागामध्ये महावितरणच्या वारंवार वीजतोडणीला कंटाळून सूरजने ही आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पंढरपूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. परंतू या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सूरज जाधव हा अल्पभूधारक शेतकरी होता. शेतीतून मिळणारं उत्पादन कमी व्हायला लागल्यानंतर त्याने जोडधंदा म्हणून गोपालन सुरु केलं. सूरजने भांडवल उभं करुन ३५ ते ४० गाई घेत दुधाचा व्यवसाय सुरु केला.
परंतू दुधाचे दर सतत वरखाली होत राहणं, गाईंच्या खाद्याचा खर्च, सरकारची धोरणं याचा ताळमेळ सूरजला लागत नव्हता. यातून आलेल्या नैराश्यामुळेच सूरजने आत्महत्या केल्याची माहिती मगरवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सूरजच्या आत्महत्येनंतर मगरवाडी ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. सूरजला आत्महत्या का करावी लागली याचा विचार सरकारने करुन यावर पावलं उचलावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या सरकारला लाज वाटली पाहिजे, थोड्या थोड्या कारणाने भांडण करणारे हे मंत्री आहेत. आता तर उर्जामंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे व शेतकऱ्यांच्या पोरांनी आता सरकारमध्यला मंत्र्यांना बदडलं पाहिजे, असं तुपकर म्हणाले. आत्महत्या नसून ही सरकारने व ऊर्जा मंत्र्याने शेतकऱयांना खोट बोलून ही हत्या केल्याचं स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर संतापाने म्हणाले.