बार्शी : थकीत वीज बील वसुलीसाठी महावितरणने वीज पुरवठा बंद करण्याचे कठोर पाऊस उचलल्यानंतर तालुक्यात ठिकठिकाणी शेतकर्यांनी अंदोलन करुन वीजपुरवठा पुर्ववत करण्याबाबत निवेदन दिले.
उन्हाळ्यास नुकताच प्रारंभ झाला आहे. पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत मागील थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या स्थानिक अधिकार्यांनी मोहीम सुरु केली आहे. राज्यात एकूणच वीजबीलाची मोठी थकबाकी असल्यामुळे वरिष्ठांकडून स्थानिक अधिकार्यांवर थकबाकी वसूलीबाबत सतत दट्ट्या लावला जात आहे.
त्यामुळे स्थानिक अधिकार्यांनाही वीजबील वसुलीसाठी विविध हथकंडे वापरावे लागत आहेत. सध्या प्रत्येक जोडणीमागे दहा हजार रुपये भरण्याबाबत महावितरणकडून आवाहन केले जात आहे. मात्र त्यास कोणी दाद देण्यास तयार नाही. सध्या शेतातील पिक हातात आले आहे. ते बाजारात जावून पैसे मिळाल्यानंतर बील भरु, अशी शेतकर्यांची भूमिका आहे. मात्र महावितरण सध्या सवड देण्याच्या परिस्थितीत नाही. त्यामुळे बील भरा नाहीतर वीज पुरवठा बंद अशी मोहिम सध्या सुरु आहे. त्यास शेतकर्यांकडून विरोध होत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे उत्पन्न घटले आहे. आता कुठे चांगली पिके निघू लागली आहेत. तशातच वीज पुरवठा बंद केल्यास पिक जळून जाईल. हातातोंडाशी आलेला घास मातीत जाईल, त्यामुळे महावितरणने सबुरीने घ्यावे, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
महावितरणच्या वसुली मोहिमेस विरोध करण्यासाठी सौंदरे येथील शेतकर्यांनी बार्शी-सोलापूर रस्ता काही काळ अडवून धरला. त्याचप्रमाणे पानगाव येथील शेतकर्यांनीही महावितरणच्या स्थानिक कार्यालयावर धडक मारली. चिखर्डे येथे कार्यालय बंद केले. आंदोलनाचे लोण हळूहळू तालुक्यात पसरत आहे.
Farmers’ agitation against MSEDCL’s electricity bill recovery campaign
□ धक्कादायक; गेम इज द ओवर म्हणत पंढरपुरात तरूण शेतक-यानी केली आत्महत्या
● वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी
सोलापूर / पंढरपूर : वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी ठरला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी (तालुका पंढरपूर) येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली. उपचारादरम्यान आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सूरजला पंढरपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मगरवाडी येथे सूरज जाधव याची शेती आहे. मात्र, शेतीत म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. शेती करत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सूरज हताश झाला होता. त्यातूनच टोकाचे पाऊल उचलत ‘शेतकऱ्यांच्या पोटी आपण परत कधीच जन्माला येणार नाही, शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करू शकत नाही, गेम इज द ओवर’ असे म्हणत सूरजने विषाचा कडवा घोट घेतला आहे.
धक्कादायक; गेम इज द ओवर म्हणत पंढरपुरात तरूण शेतक-यानी केली आत्महत्या https://t.co/RT8IaaEIhI
— Surajya Digital (@SurajyaDigital) March 4, 2022
सध्या ग्रामीण भागात शेतीपंपाची वीजतोडणी मोहिम वेगात सुरू आहे. या वीजतोडणीमुळे शेतातील उभी पिके जळून जात आहेत. या वीज तोडणी व महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने मरणापूर्वी व्हिडिओ करून आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी गेला आहे. आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरण वर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही, असे म्हणून पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली.
सूरजच्या मृत्यूनंतर स्थानिक भागामध्ये महावितरणच्या वारंवार वीजतोडणीला कंटाळून सूरजने ही आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पंढरपूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. परंतू या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सूरज जाधव हा अल्पभूधारक शेतकरी होता. शेतीतून मिळणारं उत्पादन कमी व्हायला लागल्यानंतर त्याने जोडधंदा म्हणून गोपालन सुरु केलं. सूरजने भांडवल उभं करुन ३५ ते ४० गाई घेत दुधाचा व्यवसाय सुरु केला.
परंतू दुधाचे दर सतत वरखाली होत राहणं, गाईंच्या खाद्याचा खर्च, सरकारची धोरणं याचा ताळमेळ सूरजला लागत नव्हता. यातून आलेल्या नैराश्यामुळेच सूरजने आत्महत्या केल्याची माहिती मगरवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सूरजच्या आत्महत्येनंतर मगरवाडी ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. सूरजला आत्महत्या का करावी लागली याचा विचार सरकारने करुन यावर पावलं उचलावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या सरकारला लाज वाटली पाहिजे, थोड्या थोड्या कारणाने भांडण करणारे हे मंत्री आहेत. आता तर उर्जामंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे व शेतकऱ्यांच्या पोरांनी आता सरकारमध्यला मंत्र्यांना बदडलं पाहिजे, असं तुपकर म्हणाले. आत्महत्या नसून ही सरकारने व ऊर्जा मंत्र्याने शेतकऱयांना खोट बोलून ही हत्या केल्याचं स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर संतापाने म्हणाले.