वेळापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिवसा दहा तास विज मिळावी व तोडलेला विज पुरवठा पूर्ववत करावा, या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिरासमोर रास्ता रोको केला. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते व रस्त्याच्या दुतर्फा दोन किलोमीटर वहानांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
भविष्यात वीज पुरवठा खंडीत केल्यास, शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणांत नुकसान होईल, यास जबाबदार शासन व उर्जा मंत्री जबाबदार असतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा मतदारसंघात अध्यक्ष कमलाकर माने देशमुख यांनी यावेळेस दिला. याबरोबर शेतकर्यांचा अंत बघू नका अन्यथा शेतकर्यांची पोर भगतसिंहाचा अवतार घेतील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी म्हटले.
या आंदोलनासाठी रिपाईचे मिलिंद सरतापे, बहुजन मुक्ती राज्य सदस्य काका जाधव, महेंद्र साठे, पशू खासगी डॉक्टर संघटनेचे ता. अध्यक्ष डॉ. धनंजय म्हेत्रे, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष शंकर काकुळे, सुखदेव आडत, बाळासाहेब माने देशमुख,तसेच अक्षय जाधव यांनी पाठिंबा दिला.
महावितरणचे उपअभियंता भाऊसाहेब मोटे व वेळापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी निवेदन स्वीकारले. Swabhimani Shetkari Sanghatana: Stop the road in time against electricity bill
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
निवेदन स्विकारताना उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब मोटे म्हणाले की, शेतकर्यांनी विजबिल भरलेच पाहिजे तरच महावितरण सुरु राहील व शेतकर्यांना विज मिळेल, सध्या शेतकर्यांना दोन तास विज दिली जात आहे. त्यामध्ये वाढ करुन ४ ते ५ तास विज देण्याचा महावितरणचा प्रयत्न राहील, या साठी शेतकर्यांनी वेळेत बिले भरा, असे आवाहन केले.
रस्ता रोकोला स्वाभिमानी, माळशिरस विधान परिषदेचे अध्यक्ष साहिल आतार, वेळापूर शहर अध्यक्ष सचिन पवार, मदने सर, दत्तात्रय बडगर, प्रदिप ठवरे पटिल, शिवाजी माने देशमुख,रणजित इंगळे,मिलिंद माने देशमुख,श्रीकृष्ण माने-देशमुख,भरत माने , देशमुख,विराज घर्गे, सादू राऊत,विलास बोधले,अक्षय बंडगर, शेतकरी उपस्थित होते. वेळापूर पोलिसांच्या वतीने बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
धक्कादायक ; पंढरपुरात तरूण शेतक-याची आत्महत्या
#sucides #farmers #शेतकरी #pandharpur #आत्महत्या #पंढरपूर #surajyadigital (बजरंग नागणे, पंढरपूर, पत्रकार)
● वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी… सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी (तालुका पंढरपूर) येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली
धक्कादायक
वीज तोडणी चा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरण वर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी तालुका पंढरपूर येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली pic.twitter.com/59VBs3hLkJ— Surajya Digital (@SurajyaDigital) March 4, 2022