● फिरकीचा महान जादूगर हरपला
वृत्तसंस्था : क्रिकेट जगतातून अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नचे निधन झाले आहे. तो ५२ वर्षांचा होता. हृदयविकाराच्या झटक्याने शेन वॉर्नचे निधन झाल्याचे वृत्त आहे.
शेन वॉर्नचे आज निधन झाले. १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नने ४ जून १९९३ ला एक चेंडू टाकला होता. त्याने या चेंडूवर इंग्लंडचा माजी कर्णधार माइक गैटिंग याला बाद केले होते. वॉर्नने ज्या चेंडूवर गैटिंगला आऊट केले त्या चेंडूला सारे ‘The Ball of the Century’ नावाने ओळखू लागले. यावेळी चक्क चेंडू ९० डिग्री टर्न झाला होता. हा चेंडू कोणताही क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाही.
वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई बेटावर होता आणि तेथे त्याच्या व्हिलामध्ये राहत होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पण मग या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते. Veteran Australian cricketer Shane Warne has passed away, the last tweet was made this morning
Cannot believe it.
One of the greatest spinners, the man who made spin cool, superstar Shane Warne is no more.
Life is very fragile, but this is very difficult to fathom. My heartfelt condolences to his family, friends and fans all around the world. pic.twitter.com/f7FUzZBaYX— Virender Sehwag (@virendersehwag) March 4, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननेही अलीकडेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने ट्विट करुन रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे वर्णन केले होते. वॉर्नने युक्रेनचे समर्थन केले आणि रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले होते.
□ शेन वॉर्नचं शेवटचं ट्वीट
शेन वॉर्नने आज सकाळीच ट्वीट करत क्रिकेटर रॉड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती. या ट्वीटमध्ये वॉर्नने म्हटलं होतं, “रॉड मार्श यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटलं. ते आमच्या खेळातले लिजेंड होते आणि अनेक तरूण मुलामुलींसाठी प्रेरणास्थान होते. रॉड यांना क्रिकेटविषयी प्रचंड आस्था होती. आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांनी खूप काही दिलं.
□ वॉर्नच्या कसोटीत ७०८ विकेट
ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने २००७ मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटीत ७०८ तर वनडेत २९३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. शेन वॉर्नने आपल्या खेळाने जगाला जितके प्रभावित केले आहे तितकेच त्याच्या वादांमुळे क्रिकेट जगतात निराशा झाली आहे.
१९९८ मध्ये बुकीला माहिती दिल्याबद्दल वॉर्नला दंड ठोठावण्यात आला होता आणि २००३ च्या विश्वचषकाच्या काही दिवस आधी बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्यावर क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती.
१९९६ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध वॉर्नने जोरदार गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.
□ ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. मार्श यांना गेल्या आठवड्यात क्विन्सलँडमध्ये हृदयविकाराचा झटका बसला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. विकेटकिपर असलेल्या रॉड यांनी ९६ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ३ शतक केले. विकेट्सच्या मागे ३५५ फलंदाजांना त्यांनी बाद केले आणि विश्वविक्रम केला.