● चालू अधिवेशनामध्ये आवाज उठवू – फडणवीस
पंढरपूर : मगरवाडी येथील कर्जाला कंटाळून सुरज जाधव या तरुण शेतक-याने व्हिडीओ करीत आत्महत्या केली. मृत शेतक-याच्या कुटुंबियाची आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी सांत्वनपर भेट घेऊन त्यांना एक लाख रुपये आर्थिक साहाय्य मदत केलीय.
यावेळी आमदार आवताडे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोन वरून मयत सूरज जाधव यांचे वडिलांशी चर्चा घडवून आणली. यावेळी सरकारला धारेवर धरत चालू अधिवेशनामध्ये आवाज उठवून नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
भारतासारख्या कृषीप्रधान देशात परत शेतकऱ्याच्या जन्माला येणार नाही अशी भावनिक साद घालत अखेरचा श्वास घेणाऱ्या या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने शेतकरी जातीला खूप मोठी संवेदना आणि ठेच पोहचवली आहे.
सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच आश्वासनांची पाने पुसणाऱ्या या सरकारच्या धोरणात्मक बाबींचा दोन्ही आमदारांनी तीव्र शब्दात निषेध करून करून मयत सुरज जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दिलीप घाडगे, दिलीप चव्हाण, माऊली हळणकर, भास्कर कसगावडे, सुभाष मस्के, विनोदराज लटके, शरद चव्हाण, अविनाश मोरे, बालम मुलाणी, मगरवाडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. Young farmer’s suicide; MLA Avtade, one lakh help from parichark
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ अशी केली तरूण शेतक-याने आत्महत्या
सोलापूर / पंढरपूर : वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी ठरला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी (ता. पंढरपूर) येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली होती. उपचारादरम्यान काल शुक्रवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सूरजला पंढरपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला. मगरवाडी येथे सूरज जाधव याची शेती आहे. मात्र, शेतीत म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. शेती करत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सूरज हताश झाला होता. त्यातूनच टोकाचे पाऊल उचलत ‘शेतकऱ्यांच्या पोटी आपण परत कधीच जन्माला येणार नाही, शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करू शकत नाही, गेम इज द ओवर’ असे म्हणत सूरजने विषाचा कडवा घोट घेतला. त्यातच उपचारादरम्यान मृत्यू झाला.