मुंबई : मध्य प्रदेशमध्ये काल शनिवारी काही भाविकांनी महादेवाच्या मंदिरात दूध पाजण्यासाठी रांगा लावल्या आणि बघता बघता देशभरात ही बातमी पसरली आहे. बघता बघता बातमी वा-यासारखी पसरली. मंदिरात भाविक रांग लावत दूध पाजण्याच्या चमत्काराचा अनुभव घेत आहेत. पण खरं काय वाचा सविस्तर…
महाराष्ट्रात सुद्धा अनेक महादेवांच्या मंदिरात महिला भक्तांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या मंदिरात आणि वेगवेगळ्या ठिकाणी भाविक हा प्रयोग करताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये या गर्दीमुळे पोलिसांना मंदिरात बोलावण्याची वेळ आली. पांढुर्ली येथील तेली गल्लीत असलेल्या महादेव मंदिरात तसेच चुंचाळे शिवारात महिलांची आणि भाविकांची सायंकाळी पाच वाजल्यापासून गर्दी जमा झाली. जळगाव तालुक्यातील शिरसोलीत प्र.न. येथे नंदी पाणी पितोय, या चमत्काराची पोस्ट सोशल मीडियावर फिरली.
अंनिसच्या काही कार्यकर्त्यांनी यामागे वैज्ञानिक कारण असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव आहे. अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे. Nandi is drinking milk everywhere in the temple, but what is the truth … read more
महादेवाचा नंदी पितोय दूध? अफवेने महिलांची मंदीरात गर्दी; पाहा व्हिडिओ#Mahadeo#Nandi #DrinkMilk pic.twitter.com/KG5IbOfTZq
— Datta Lawande (@datta_lawande96) March 5, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कोणतीही निर्जीव वस्तू पाणी पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी खेचते ते केवळ पृष्टीय ताण आणि केशाकर्षण या वैज्ञानिक तत्त्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे निर्जीव वस्तूने पाणी पिणे असा होतो. यामागे कोणत्याही प्रकारचा दैवी चमत्कार नसून भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले जात आहे.
महाराष्ट्रात नंदीची मूर्ती दूध पित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. औरंगाबाद, धुळे, जालना, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, वाशिममध्ये नागरिक मंदिरात जाऊन नंदीच्या मुर्तीला दूध पाजत आहेत. या मागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत, ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे. विज्ञानाच्या नियमांवर आधारित ही घटना आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
नंदी, महादेवाची मूर्ती, कासव हे पाणी पितानाचा चमत्कार सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. यामुळे मंदिरात भाविक रांग लावत दूध पाजण्याच्या चमत्काराचा अनुभव घेत आहेत.
□ गणपतीही दूध पीत असल्याची अफवा
१९९५ साली गणेशोत्सवानंतर अचानक देशाच्या कानाकोपऱ्यातील गणपतीच्या मूर्ती दूध पित असल्याची अफवा पसरली होती. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली. मात्र ती कोठून पसरली माहित नाही, मात्र बघता बघता देशाच्या कानाकोपऱ्यातील गणेश मंदिरात तसेच घरातील गणेशाच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी भक्तांची झुंबड उडाली. यावेळी या प्रकाराला कोणताही वैज्ञानिक पुरावा नसल्याने हा प्रकार एक – दोन दिवसात बंद झाला.
● नंदी पाणी – दुध पितो, असा चमत्कार घडत असल्याच्या अफवा पसरल्यात. तसे व्हिडिओ viral होत आहे. असे चमत्कार कधीही घडत नाहीत. अशा घटनांच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम, हातचलाखी, रसायनाचा वापर, सराव अशा गोष्टी असतात. जसा गणपती दुध पिला नव्हता तसाच नंदी सुध्दा दूध-पाणी पितो..ही सुद्धा अफवा आहे.
– राहुल कुलकर्णी, पत्रकार