● महाराष्ट्राची लेक स्मृती मानधनाचे अर्धशतक
वेलिंग्टन : WWC 2022 मध्ये भारताने पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव केला. भारताने पाकिस्तानला 245 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी संघाला भारतीय संघाने पराभूत केले. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने 4 विकेट घेतल्या. स्नेह राणाने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये कमाल केली आणि 2 विकेट घेतल्या. झुलन गोस्वामी 2, दीप्ती शर्मा आणि मेघना सिंगला 1-1 विकेट घेतल्या.
महिला विश्वचषक 2022 ची सुरुवात न्यूझीलंडमधील माऊंट मौनगानुई येथे झाली. भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये सामना झाला. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी केली. 2017 च्या विश्वचषकात भारतीय संघाचा अंतिम फेरीत इंग्लंड संघाकडून पराभव झाला होता. अशा परिस्थितीत यावेळी मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विजयाने आपला प्रवास सुरू करायचा आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तान समोर 245 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या खेळाची सुरुवात खराब झाली असली तरी, तीन अर्धशतकांमुळे भारताला 244 धावसंख्या गाठता आली आहे. सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 स्पर्धेत भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला.
महिला खेळाडूंच्या वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाली आहे. आज (6 मार्च) भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीला सुरुवात केली आहे. या सामन्यात सलामवीर शेफाली वर्मा एकही धाव न करता तंबूत परतली आहे. त्यानंतर डाव सांभाळत स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. यात स्मृतीने 72 चेंडूत 52 धावा करत वनडेमध्ये 21 वे अर्धशतक केलं आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण पाकिस्तानचा डाव अवघ्या 137 धावांमध्ये आटोपला. भारतीय आणि पाकिस्तान महिला संघामधील हा 11 वा वनडे सामना होता. भारतीय महिलांनी आपला रेकॉर्ड कायम ठेवला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला नमवण्याची ही दहावी वेळ आहे. Women’s World Cup: India beat Pakistan by 107 runs, the tenth time to beat Pakistan
Simply magical from Rajeshwari Gayakwad 💫#CWC22 #PAKvIND pic.twitter.com/eegUbT8JwE
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 6, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसल्यानंतर स्मृती मानधना व दीप्ती शर्मा यांच्या 92 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला कमबॅक करून दिले होते. प्ती धावांवर माघारी परतली. त्यानंतर स्मृती 75 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 52 धावांवर बाद झाली. 1 बाद 96 अशा मजबूत स्थितीत असणाऱ्या भारताची अवस्था 6 बाद 114 अशी झाली.
हरमनप्रीत कौर ( 5), कर्णधार मिताली ( 9) व रिचा घोष ( 1) यांचे अपयश भारताला महागात पडताना दिसत होते. पण, पूजा वस्त्राकर आणि स्हेन राणा यांनी सामनाच फिरवला. या दोघींनी सातव्या विकेटसाठी 97 चेंडूंत 122 धावांची भागीदारी केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सातव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. पूजा 59 चेंडूंत 8 चौकारांसह 67 धावांवर बाद झाली. भारताने 7 बाद 244 धावा उभ्या केल्या. स्नेह 48 चेंडूंत 53 धावांवर नाबाद राहिली.
प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सिद्रा अमीन व जवेरीया खान यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी 11 षटकांत केवळ 28 धावा केल्या. राजेश्वरी गायकवाडने पाकिस्तानला पहिला धक्का देताना खानला ( 11) बाद केले. भारतीय गोलंदाज टिच्चून मारा करताना धावांवर चाप लावून ठेवताना दिसले. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवरील दडपणही वाढताना दिसले.
From 114/6 to 244/7 👊
India recover from a difficult situation thanks to brilliant innings from Pooja Vastrakar (67) and Sneh Rana (53*).
Can Pakistan chase it down?#CWC22 pic.twitter.com/RKcOF7KtsR
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 6, 2022
दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी अनुक्रमे कर्णधार बिश्माह मरूफ ( 15) व ओमाइमा सोहैल ( 5) यांची विकेट घेतली. अमीन एका बाजूने संघर्ष करत होती. पण, भारताची अनुभवी गोलंदाज 34 वर्षीय झुलन गोस्वामीने तिला बाद केले. झुलनने अमीन ( 30) व निदा दार ( 4) यांना माघारी पाठवून पाकिस्तानची अवस्था 5 बाद 70 अशी केली.
त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने सहावी विकेट घेताना आलिया रियाझला ( 11) यष्टिचीत केले. गायकवाडने सातत्यपूर्ण कामगिरी केली. गायकवाडने 31 धावांत 4 विकेट्स घेतल्या. झुलनने 26 धावांत 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 137 धावांवर तंबूत पाठवून भारताने 107 धावांनी विजय मिळवला.