नवी दिल्ली : भारताचे पॅलेस्टाईनमधले राजदूत मुकूल आर्य यांचे काल रविवारी निधन झाले. विशेष म्हणजे पॅलेस्टाईन मधील भारतीय दुतावासात त्यांचा मृतदेह आढळून आला. आर्य यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती अजून तरी पूर्णपणे दिली गेलेली नाही. पॅलेस्टाईनच्या सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. मुकूल आर्य यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की काही घातपात केला गेलाय याचा तपास केला जात आहे.
रशिया-युक्रेन यांच्यात गेल्या अकरा दिवसांपासून युद्धाचा संघर्ष सुरु असताना भारतासाठी ही वाईट बातमी समोर आली आहे.
आर्य यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती अजून तरी पूर्णपणे दिली गेलेली नाही. पण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आर्य यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय तर पॅलेस्टाईनच्या सरकारनं घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. मुकूल आर्य यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की काही घातपात केला गेलाय याचा तपास केला जातोय. त्याबद्दलची सविस्तर माहिती दिवसभरात मिळण्याची शक्यता आहे. मुकूल आर्य हे 2008 च्या IFS बॅचचे अधिकारी आहेत.
भारतीय प्रशासकिय सेवेतील अधिकारी मुकूल आर्य यांचा मृत्यू नेमका किती वाजता झाला याची अजून तरी माहिती नाही पण रामल्लामधल्या भारतीय दुतावासातच त्यांचा मृतदेह आढळून आलाय.
Indian Ambassador Mukul Arya dies; Suspicion of assassination
Deeply shocked to learn about the passing away of India’s Representative at Ramallah, Shri Mukul Arya.
He was a bright and talented officer with so much before him. My heart goes out to his family and loved ones.
Om Shanti.— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) March 6, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यांच्या निधनाचं वृत्त ‘धक्कादायक आणि आश्चर्यकारक’ असल्याचं पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. पॅलेस्टाईनचं परराष्ट्र मंत्रालय राजदूत आर्य यांच्या निधनाने जी हाणी झालीय, वेदना झालीय त्याबद्दल दु:ख व्यक्त करतं. मुकूल आर्य यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी सर्व अरेंजमेंट केल्या जात असल्याचही प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनीच मुकूल आर्य यांच्या निधनाचं वृत्त ट्विटरवर दिलंय. ते म्हणाले- भारताचे रामल्लामधले प्रतिनिधी मुकूल आर्य यांच्या निधनानं धक्का बसलाय. ते एक हुशार आणि तेजस्वी अधिकारी होते. खूप काही अजून त्यांच्यासमोर होतं. त्यांचं कुटूंब आणि नातेवाईकांप्रती माझी सहवेदना.
□ मुकूल आर्य यांच्याविषयी
मुकूल आर्य हे पॅलेस्टाईनमध्ये भारताचे राजदूत होते. ते 2008 च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी होते. याआधी त्यांनी रशियाची राजधानी मॉस्को आणि अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय दुतावासात जबाबदारी सांभाळलेली होती. यूनेस्कोत पॅरीसलाही ते भारताचे प्रतिनिधी होते.
त्यांनी दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयू म्हणजे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यानंतर ते भारतीय परराष्ट्र सेवेत रूजू झाले होते. फ्रान्सच्या पॅरिसमध्ये युनेस्कोसाठी हिंदुस्थानच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाचेही ते सदस्य होते. नवी दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयातही त्यांनी काम केले होते.