मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत आज गंभीर आरोप केलेत. भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत सरकारने षड्यंत्र रचले, असा आरोप त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा म्हणून विधानसभा अध्यक्षांना पेनड्राईव्ह दिले. चाकू प्लांट करण्यापासून व गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जचा धंदा कसा दाखवायचा, याविषयी पेनड्राईव्हमध्ये पुरावे आहेत, असे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर 2018 सालच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसंबंधित असलेल्या एका वादावर बनावट गुन्हा नोंद करण्यात आली. गिरीश महाजनांना मोका लावण्यात यावा असे कागदपत्रे तयार करण्यात आली. विरोधकांची कत्तल कशी करायची या संदर्भातील कट कारस्थान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांच्या कार्यालयात शिजला.” New bomb! Shocking allegation of Devendra Fadnavis
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकारचं रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असंही ते म्हणाले. या व्हिडीओच्या 20 ते 25 वेब सीरीज होतील असाही टोला त्यांनी लगावला.
जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त ॲड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद तिकडे वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी, “गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्या”, अशी धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटलेलं आहे.