कुर्डूवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने बंगलोर – मुंबई उद्यान एक्सप्रेसचे स्टेअरींग सोलापूर ते दौंड महिलांच्या हाती देऊन महिलांचा सन्मान केला.
या उद्यान एक्सप्रेसच्या लोकोपायलट अनिता राज व सहा लोकोपायलट भावना कोष्टा तर गार्ड (ट्रेन मॅनेजर) म्हणून वैशाली भोसले यांनी काम पाहिले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनीही उत्साहात आपल्या पदाचा पदभार स्वीकारून नवे आव्हान यशस्वीरीत्या पेलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
पुरुषांची विविध क्षेत्रात असलेली मक्तेदारी संपवत आज स्त्रियाही अनेक क्षेत्रात अग्रेसर झाल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर आज स्त्रिया पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेच आहेत. सर्वच क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. आज मंगळवारी (दि. ८ ) जागतिक महिला दिन यानिमित्ताने सोलापूर विभागातील महिला लोकोपायलट अनिता राज व सहा लोकोपायलट भावना कोष्टा तर गार्ड वैशाली भोसले यांनी बंगलोर- मुंबई उद्यान एक्सप्रेसचा ताबा घेत हिरवा झेंडा दाखविला. World Women’s Day Park Express in the hands of women
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोलापूर ते दौंड अशी ही रेल्वे चालवली. गाडी कुर्डुवाडी स्थानकात दुपारी १२ वाजता आली. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या लोकोपायलट, सहायक लोकोपायलट व गार्ड यांना कुर्डुवाडी जंक्शनच्यावतीने बुके देऊन सत्कार करण्यात आला. दहा मिनिटांचा थांबा घेत ही एक्सप्रेस गाडी पुढील प्रवासासाठी दौंडच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी त्यांच्यासोबत लोको इन्स्पेक्टर साजिद शेख उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! तुझ्या उत्तुंग भरारी पुढे आभाळ ठेंगणे भासावे,
#surajyadigital
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. ती आहे म्हणून हे विश्व आहे. ती आहे म्हणून घराला घरपण आहे
#womensday2022 #सुराज्यडिजिटल #महिलादिन #womenday #women #womenpower
ती आहे म्हणून नात्याला जिवंतपणा आहे तिचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.