● देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडलं
मुंबई : अंडरवर्ल्ड गुंड दाऊद इब्राहिम कनेक्शन प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, या मागणीसाठी मुंबई आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे.
भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढला. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढून भाजपनं शक्तिप्रदर्शन केलं, मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. नंतर पोलिसांनी फडणवीस यांना सोडलं असून इतर नेत्यांची सुटका करण्यात आली.
मोर्चानंतर ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांना यलो गेट पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले होते. यानंतर त्यांना तक्रार केल्यानंतर सोडण्यात आले आहे. पोलिसांनी पाऊणतास फिरवल्यानंतर पोलीस ठाण्यात घेऊन गेले असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढणाऱ्या भाजप नेत्यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. मोर्चा सुरु होण्यापूर्वी आझाद मैदानात भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकार आणि आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. BJP aggressors against Nawab Malik, activists took to the streets
Mumbai police detain BJP leader Devendra Fadnavis and other leaders of the party as they were carrying out a protest march demanding the resignation of state minister Nawab Malik #Maharashtra pic.twitter.com/EfEM3AytO7
— ANI (@ANI) March 9, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. दरम्यान पोलिसांनी फडणवीस यांना सोडलं असून इतर नेत्यांनाही सुटका केली. ‘नवाब मलिक हटाव. मुंबई बचाव.’ अशी घोषणा देत हा मोर्चा निघाला. भायखळा परिसरातील वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चाचा मार्ग होता. दुपारी बारा वाजता या मोर्चाची सुरुवात होईल, अशी माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली होती. या मोर्चाला 30 ते 40 हजार लोक उपस्थित होती.
देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी आवाहन केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय तसेच त्यांनी घोषणासुद्धा दिल्या आहेत. फडणवीसांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमापाशी ठिय्या मांडला. पोलिसांनी या भागात मोठ्या प्रमाणात बॅरिगेट लावले. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला. नवाब मलिक यांच्याविरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली. पोलिसांना कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मोर्चापूर्वी फडणवीस यांनी केले.
हे राजकीय आंदोलन नाही. मुंबईच्या खुन्यांशी ज्यांनी सौदा केला आणि त्यांना फायदा पोहोचवून दिला. अशा लोकांवर झालेली कारवाई आहे. अशा लोकांनी ज्यांनी मदत केली आहे. देशाच्या शत्रूसोबत कोणी सौदा करत असेल तर आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. पण यांना मंत्रिमंडळात राहू देणार नाही, असे फडणवीस पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर म्हणाले.
□ नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही – शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायचा काही संबंधच नाही. मुस्लिम नेता असला की त्याचा संबंध थेट दाऊदशी जोडला जावा हे निरर्थक आहे. एक पक्ष म्हणून आम्ही सदैव त्यांच्याशी पाठीशी मजबुतीने उभे राहू, असं पवार म्हणाले.