□ अवैधरित्या गर्भपात केंद्र किंवा सोनोग्राफी केंद्र चालवलं जात असल्याचा संशय
नागपूर : नागपूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत 5 अर्भकं सापडली आहेत. ही घटना आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.या परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.
क्वेटा कॉलनी येथील जुना देवडिया रुग्णालयाच्या भिंतीजवळ ही अर्भक सापडली आहे. तर 3 ते 5 महिन्यांची ही अर्भकं आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी वर्ध्यात जानेवारी महिन्यात वर्ध्यातील आर्वीमध्ये असाच प्रकार समोर आला होता. हॉस्पिटलच्या आवारात अर्भकाच्या कवट्या आणि हाडं सापडली होती. या प्रकरणाचा तपास आणखी अपूर्ण आहे. अशातच आता नागपुरात अर्भकं आढळून आले आहेत. नागपूर शहरातील लखडगंज भागात ही घटना उघडकीस आली आहे. केटी वाईन शॉप्सजवळील कचरा डंपिंग यार्डमध्ये आज बुधवारी सायंकाळी पाच अर्भकं आढळली आहे. 5 infants found in garbage dump in Nagpur suspected of operating abortion center or sonography center illegally
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जवळ जाऊन बघितले असता त्यात रक्ताचे डाग असलेले विचित्र कापड दिसले. नंतर या पिशव्यांमध्ये अभर्क असल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे याठिकाणी दवाखान्यातील कचराही पडलेला आहे. कचऱ्याच्या ढीगाऱ्यावर बायो मेडीकल वेस्टही सापडलं आहे. पोलिसांना येथे किडनी, हाडही सापडली आहेत. त्यामुळे वैद्यकीय टीम या भागात तपासणी करत असून आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या प्रकाराच्या मागे कोण आहे, याचा तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाचही अर्भक ताब्यात घेतले आहे. हे पाच अर्भक कुणी आणि का टाकले? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार सापडलेल्या अर्भकांपैकी बहुतांश अर्भक ही मुलींची आहेत. बेवारस पद्धतीने सापडलेली अर्भक आणि त्याशेजारी असलेले औषधांचे बॉक्स यामुळे जवळपासच कुठेतरी अवैधरित्या गर्भपात केंद्र किंवा सोनोग्राफी केंद्र चालवलं जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर फॉरेन्सिक विभागाने तपासाला सुरुवात केली आहे.