Sunday, May 29, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

धक्कादायक : ज्येष्ठ साहित्यिक एम जी भगत पंढरपूरमध्ये आढळले बेवारस स्थितीत

Surajya Digital by Surajya Digital
March 10, 2022
in Hot News, सोलापूर
0
धक्कादायक : ज्येष्ठ साहित्यिक एम जी भगत पंढरपूरमध्ये आढळले बेवारस स्थितीत
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात बेवारस व्यक्ती आढळतात. या बेवारस व्यक्तींना राॅबिण हुड आर्मी मदत करते. हे पंढरपूर शहरात नित्याचीच बाब झाली असल्यामुळे याकडे फारसे कोणी‌ लक्ष देत नाही. मात्र, बुधवारी रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला.

ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, पत्रकार एम जी भगत हे पंढरपूरमध्ये अतिशय दयनीय अवस्थेत आढळून आले आहेत. रस्त्यांच्या कडेला अन्न पाणी आणि वैद्यकीय मदतीसाठी याचना करीत असताना पंढरपुरातील रॉबिनहुड आर्मीचे सदस्य सुजित दिवाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ही धक्कादायक बाब समोर आली.

बुधवार, 9 मार्च रोजी रात्री 10 च्या सुमारास भक्ती मार्गावरील सैनिक शाळेजवळ एक भिकारी व्यक्ती मदतीसाठी याचना करीत असल्याची बातमी रॉबिन हुड आर्मीचे सदस्य सुजित दिवाण यांना समजली. या माहिती वरुन दिवाण आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. नेहमी प्रमाणे लोकांशी संवाद साधत असताना भगत यांचा इंग्लिशमधील संवाद पाहून दिवाण अचंबित झाले. Shocking: Veteran writer MG Bhagat found in a dilapidated condition in Pandharpur

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

दिवाण यांनी अधिक खुलासेवार विचारणा केली असता भगत यांनी सांगितले, मी वर्ध्याचा राहणारा आहे. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मी गावाकडून निघालो, रेल्वेने प्रवास करीत असताना काय घडले माहीत नाही पण माझी बॅग, मोबाईल, पैसे सर्व गायब झाले.

माझ्या हाताला पायाला जबरदस्त मार लागला आहे. मला काहीही हालचाल करता येत नाही माझी शुद्ध सारखी हरपते. एकच कपडे असल्याने माझी अवस्था भिकाऱ्या सारखी झाली आहे. तीन दिवस झाले मी रेल्वे स्टेशनच्या या बाहेरील रस्त्यांवर पडून आहे. लोक भिकारी समजून अन्न पाणी देतात. पण मी कोण हे समजून घेत नाहीत आणि मलाही तितका त्राण नाही.

एम जी भगत यांचे वक्तव्य ऐकून गर्भगळीत झालेल्या सुजितने गुगलवर सर्च मारुन भगत यांची माहिती शोधली आणि तो ही अचंबित झाला. एक महान साहित्यिक, पत्रकार, संपादक या अवस्थेत पाहून त्यालाही गहिवरुन आले त्याने तातडीने 108 रुग्णवाहिका बोलावून भगत यांना वैद्यकीय उपचारासाठी सोलापूर येथे हलविले आहे. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात भगत यांच्यावर उपचार सुरु आहेत. भगत यांची ही अवस्था का आणि कशामुळे झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

● भगत यांची ओळख…

मिनिस्टर ऑफ एज्युकेशन या विभागात काम केले क्लास टू ऑफिसर, संपादक, लेखक, अनेक वृत्तपत्रांना संपादक, अनेक कंपन्यांचे संपादकीय संचालक होते. एम.जी भगत, मुलाचे नाव सुशील भगत, पत्ता हिंद नगर, हिंदुराष्ट्र भाषा समिती रेल्वे स्टेशन जवळ, वर्धा.

– भगत यांच्या वाक्य होते

“Will you please arrange me 50 rupees? I will pay back. मला एक टॉवेल खरेदी करायचा आहे की जेणेकरून मी आंघोळ करू शकेल,

————‐—————–

□ कारच्या धडकेनं दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

बार्शी : कारने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील गोरोबा मारूती तुळजापुरे व अंकुश बाजीराव तुळजापुरे हे चुलते-पुतणे गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील भानसगाव शिवारात घडली आहे.

याबाबत जखमींचा मावसभाऊ रहिवासी महादेव गुलचंद सरवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कारचालक  समाधान जयवंत शेंडगे रा. बार्शी याच्याविरोधात पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील कारी ते भानसगाव रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास कारी येथील खंडोबा मंदिरचे डावे बाजुला  भानसगावाकडून  चुकीच्या बाजूने आलेल्या आरोपीच्या कारने जखमी चालवित असलेल्या दुचाकीला समोरुन जोरात धडक दिली. त्यामुळे गोरोबा हा कारच्या खाली डाव्या बाजूच्या दोन चाकांमध्ये जावून अडकला तर अंकुश उडून बाजूला पडला होता.

किशोर तुळजापूरे हा कारी येथील आपल्या शेतामधून परतत असताना त्यास हा अपघात दिसला. त्याने लागलीच फिर्यादी व गावातील लोकांना याची माहिती दिली. त्यांनी अपघात स्थळी जाऊन जखमींना तातडीने उपचारासाठी नेले. गोरोबा तुळजापुरे यांना डावे पायाला, व डोक्याला मार लागलेला होताव अंकुश तुळजापुरे यास उजवे पायाला,व डोक्याला मार लागून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. दोघांनाही गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

 

Tags: #Shocking #Veteran #writer #MGBhagat #found #dilapidated #condition #Pandharpur#धक्कादायक #ज्येष्ठ #साहित्यिक #एमजीभगत #पंढरपूर #बेवारस #स्थितीत
Previous Post

नागपुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 5 अर्भकं

Next Post

शिवसेना – राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतदान; संजय राऊत फेल

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
शिवसेना – राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतदान; संजय राऊत फेल

शिवसेना - राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतदान; संजय राऊत फेल

वार्ता संग्रह

March 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Feb   Apr »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697