बार्शी : गेल्या चार महिन्यांपासून अधिककाळ रखडलेल्या एसटी संपाचा बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला आहे. या संपामुळे ग्रामीण भागातील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. एसटी संपामुळे बाजारपेठेचा कणाच मोडला आहे.
ग्रामीण भागातील ग्राहक वाहतुकीचे सहज साधन नसल्यामुळे नियमितपणे बाजारपेठेत येत नसल्यामुळे किरकोळ विक्रेते, कापड व्यापारी, फळ विक्रेते आणि अन्य व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या बाजारपेठेचे एसटी संपाने अगदी कंबरडे मोडले आहे. त्यामुळे एसटीचा संप कधी मिटतो याकडे सरकार, एसटी कर्मचारी आणि प्रवाशांबरोबरच बाजारपेठेचेही लक्ष लागले आहे.
बार्शी तालुक्यात शहरापेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात वसते आहे. जीवनावश्यक वस्तूसह अन्य सर्व बाबींसाठी ग्रामीण भागातील नागरिक कमी-जास्त फरकाने बार्शीवर अवलंबून आहेत. शिक्षण, नोकरी, वैद्यकीय आणि अन्य कारणांसाठी दररोज ग्रामीण भागातून शहरात येणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तालुक्यातील बहुतांश सर्व गावे एसटीने बार्शीशी जोडलेली आहेत. त्यामुळे स्वत:ची वाहने नसलेल्या सर्वसामान्य लोकांना बार्शीला येण्यासाठी एसटीचा मोठा आधार होता.
मात्र गेल्या चार महिन्यांपासून हा आधारच तुटला आहे. सुरुवातीच्या काळात तर एसटी पूर्णपणे बंद असल्यामुळे शहराचा संपर्कच तुटला होता. Adverse effects of protracted ST strikes on the market; The market was shattered
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
ज्यांच्याकडे खाजगी वाहने आहेत, तेच लोक थोड्याफार प्रमाणात ये-जा करत होते. मात्र स्वत:कडे कसलेच वाहन नसलेल्या लोकांची मोठी गोची झाली होती. त्यांना अत्यावश्यक कारणाशिवाय भरमसाठ भाडे मोजून खाजगी वाहनाने येण्याची कसलीच मुभा नव्हती.
आता एसटी तुरळक प्रमाणात सुरु झाली असली तरी एक चतुर्थांश लोकच कामावर हजर आहेत. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आंतरजिल्हा आणि महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूकच कशीबशी सुरु आहे. ग्रामीण भागात अजूनही एसटीच्या पूर्वीसारख्या खेपा होत नाहीत. त्यामुळे ही गोची कायम आहे. पुर्वी शेतात पिक तयार झाले की बाजारपेठेत मोठी रेलचेल होत असे. आडतीवरुन उचल घेवून शेतकरी गरजेच्या वस्तू घेण्यासाठी बाजारपेठेत धांदल करीत असे. काहीना काही कामानिमित्त शहरात दररोज येणारे लोक थोडीफार खरेदी उरकल्याशिवाय गावाकडे परतत नसत. त्यामुळे शहरातील बाजार पेठ ही स्थानिक नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहिलेली आहे.
एसटीच्या संपाने त्यांच्या ग्राहकांचा आणि चलनवलणाचा मोठा भाग ठप्प झाला आहे. त्यामुळे सध्या शहरातील बाजारपेठेमध्ये कायम सामसूम दिसत आहे. अगदी शनिवारच्या बाजारदिवशीही पूर्वी होणारी गर्दी अजूनही पूर्ववत झालेली नाही. पिढ्यापिढ्या ग्राहक जपलेल्या अनेक व्यापारी पेढ्याही एसटी संपांमुळे बाजारपेठेला मोठा फटका बसल्याचे आवर्जून सांगत आहेत.
शहरातील फळ व्यापार असो कि कापड बाजार असो. ग्राहकांच्या बाजारपेठेत न येण्यामुळे विक्रेते हैराण झाले आहेत. सरकारची बाजू योग्य आहे कि एस टी कर्मचाऱ्यांची यात त्यांना पडायचे नाही. मात्र अभूतपूर्व रेंगाळलेल्या संपाने बाजारपेठेचा कणाच मोडला जात आहे, याकडे ते लक्ष वेधत आहेत. त्यामुळे काहीही तोडगा काढा, मात्र संप मिटवा, अशी मागणी ते करत आहेत.